पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस; लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 21:59 IST2021-06-04T21:58:23+5:302021-06-04T21:59:02+5:30

कल्याण येथील रहिवासी रजिया सुलताना मुजाहिद खान (रा. कल्याण)  ह्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसने बक्सर ते कल्याण असा प्रवास करीत होत्या.

Five and a half lakh stolen from Pataliputra Express; File a case with the Railway Police | पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस; लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीस; लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

भुसावळ जि. जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाकडील बॅगेतून  चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना बक्सर ते कल्याण दरम्यान २९  मे रोजी घडली. 

कल्याण येथील रहिवासी रजिया सुलताना मुजाहिद खान (रा. कल्याण)  ह्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसने बक्सर ते कल्याण असा प्रवास करीत होत्या. बी- ५ या डब्यात  बर्थ क्रमांक ३३ वर त्या झोपल्या असल्याची संधी साधत चोरट्याने त्यांच्याकडील बॅग लांबवली. त्यात सोन्या-चांदीचे दागिने, चार हजार ५०० रुपये रोख, मोबाईल असा सुमारे पाच लाख ६२ हजार २४० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री वर्ग करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक केरूळकर करीत आहेत.

Web Title: Five and a half lakh stolen from Pataliputra Express; File a case with the Railway Police