बुरशीनाशकांचा ट्रक जळगावात लुटला

By Admin | Updated: July 3, 2017 04:27 IST2017-07-03T04:25:16+5:302017-07-03T04:27:49+5:30

बुरशीनाशक पावडरचे चार टन वजनाचे खोके घेऊन जाणारा ट्रक शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुसुंबा (ता. रावेर) येथे

Fishery truck looted in Jalgaon | बुरशीनाशकांचा ट्रक जळगावात लुटला

बुरशीनाशकांचा ट्रक जळगावात लुटला

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर (जि. जळगाव) : बुरशीनाशक पावडरचे चार टन वजनाचे खोके घेऊन जाणारा ट्रक शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुसुंबा (ता. रावेर) येथे तिघांनी लुटला. त्यातील ३० हजार रुपये किमतीचे नऊ खोके चोरट्यांनी लंपास केले. हा ट्रक जम्मूहून अकोल्याकडे जात होता. या ट्रकमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक पावडरचे चार टन वजनाचे ३०२ खोके होते. ट्रक पालमार्गे अकोल्याकडे जात होता.

Web Title: Fishery truck looted in Jalgaon