शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्यावर्षीच अनेक श्लोक, स्तोत्र पाठांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:37 IST

लिहीता वाचता येत नाही, पण...। काव्याच्या पाठांतर क्षमतेला दाद

विहार तेंडुलकर।जळगाव : कोवळ्या वयामुळे लिहीता वाचता येत नाही. पण पाठांतर एवढं प्रगल्भ की तिच्या बुध्दीमत्तेकडे पाहताना भुवया उंचवाव्यात. होय, वय वर्षे पाच. सिनिअर केजीत शिकणाऱ्या काव्या जितेंद्र पाटील हिचे या वयात गजानन बावन्नी, रामरक्षा स्तोत्र, गणपती स्तोत्र (मराठी आणि संस्कृत) गीतेतील १५ वा अध्याय, हनुमान चालिसा सर्व काही तोंडपाठ आहेत.शहरातील श्रीहरीनगरमध्ये राहणारी काव्या हिचे वडिल खासगी नोकरी करतात तर आई गृहीणी आहे. काव्याला अगदी तिसºया वर्षापासूनच अध्यात्माची आवड आहे. त्यामुळे ती तिच्या आजीबरोबर स्तोत्र, श्लोक पाठांतर करायला बसायची. त्यातूनच तिचे पाठांतर होत गेले. विशेष म्हणजे तिची पाठांतर करण्याची क्षमता एवढ्या छोट्या वयातच इतकी चांगली आहे की, ती दोनदा ऐकल्यावर ते स्तोत्र वा श्लोक लागलीच म्हणून दाखवते. त्यामुळे अनेक स्तोत्रे तिची या वयातच पाठ आहेत.हनुमान चालिसा, संस्कृत आणि मराठीमध्ये गणपती स्तोत्र, गीतेतील १५वा अध्याय, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा हे अगदी तोंडपाठ आहे. तिचा दिनक्रमही असा आहे की, अनेकांना आश्चर्य वाटेल. सकाळी उठल्यानंतर ७.३० वाजता शाळेत जाण्यापूर्वी ती स्वत:हून श्लोक, स्तोत्राचे पठण करते आणि नंतरच शाळेत जाते.तिच्या बोबड्या बोलातील या पाठांतराने अनेकांना वेड लावले आहे. ती स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान विद्यालयाच्या सिनिअर केजीमध्ये सेमी इंग्लिश घेऊन शिकत आहे.वय कमी असल्याने तिला लिहीता वाचता येत नाही. त्यामुळे ती ऐकूनच मनात साठवते अन् पाठांतर करते. यावरूनच तिच्यातील पाठांतर करण्याची क्षमता किती तल्लख आहे, याची प्रचिती येते.दीड महिन्यापूर्वी गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त गजानन महाराज मंदिरात भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काव्याने गजानन बावन्नी म्हणून दाखविली. त्यावेळी या मंदिरातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे तर तिच्या बोबड्या आवाजातील हे बिनचूक श्लोक ऐकून अनेकांनी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव