शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर शहरात धाडसी घरफोडी

By admin | Updated: March 28, 2017 00:09 IST

चोरटे सक्रिय : 70 हजारांचा ऐवज लंपास, रहिवाशांमध्ये पसरली घबराट

फैजपूर : शहरात चोरटे सक्रिय झाले आहेत. रविवारच्या मध्यरात्री धनाजी नाना महाविद्यालयासमोरील उपासना कॉलनीत दरवाजे, ग्रील तोडून धाडसी घरफोडी केली. त्यात चोरटय़ांनी सोने-चांदीचे दागिने व 20 हजार रुपये रोख असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेने परिसरातील  रहिवासी भयभीत झाले आहेत. जवळच असलेल्या एका घराजवळून दुचाकीसुद्धा चोरीस गेली आहे.उपासना कॉलनीतील ज्योती नोमदास जावळे यांच्या घरी ही धाडसी घरफोडी झाली आहे. रविवारच्या मध्यरात्री चोरटय़ांनी घराच्या साईडला असलेल्या लोखंडी चॅनल गेटला लावलेले कुलूप आधी तोडून त्यानंतर लाकडी दरवाजाला होल पाडले आणि आतील कडी उघडली व घरात प्रवेश केला. घरातील 35 ग्रॅम सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीची भांडी व 20 हजार रुपये रोख असा 69 हजारांचा ऐवज लंपास केला. चोरटय़ांनी घरातील कपाट शोधून काढले. त्यातील सामान व कपडे अस्ताव्यस्त फेकले. ज्या हॉलमध्ये जावळे कुटुंब झोपले होते, त्याच ठिकाणाहून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली.दरम्यान, याच घराजवळ राहणा:या एका विद्याथ्र्याची दुचाकीसुद्धा चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी भेट दिली. ज्योती जावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साठे व हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव हे करीत आहेत. या घटनेमुळे शहरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.   चोरटय़ांच्या हाताचे मिळाले ठसे घरफोडीची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच, फौजदार रामलाल साठे, कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत पंचनामा केला. घटनास्थळाला ठसे तज्ज्ञांनी भेट दिली. त्यांना काही ठिकाणी बोटांचे ठसे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.