शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत बँकेतून पैसे काढण्याची डाक विभागाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 13:59 IST

संचारबंदीमध्ये बँकेतून पैसे काढण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांना मिळणार दिलासाघरपोच मिळणार रक्कम

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता डाक विभागाने नागरिकांना कोणत्याही बँकेतून पैसे काढून देण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. डाक विभागाने मागील वर्षीही नागरिकांना जवळपास १२ कोटी रुपयांचे वाटप केले होते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १४ रोजी तातडीची बैठक घेत भारतीय डाक विभागाने कोविड-१९ च्या काळात शहरी भागासह ग्रामिण भागातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तब्बल २६ हजार ग्राहकांच्या कोणत्याही बँक खात्यात असलेली रक्कम ग्राहकांना घरपोप उपलब्ध करुन दिली होती. ही रक्कम तब्बल १२ कोटी ११ लाख रुपयांच्या रकमेची वाटप केली होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांनी डाक विभामाच्या कामाची प्रशंसा केली. तसेच सध्या सुरू असलेल्या संचारबंदीतही डाक विभागाकडून घरपोच उत्कृष्ट सेवेची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय डाक विभागाच्या ग्राहकांसोबत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यामार्फत कुठल्याही शेड्युल बँकेच्या ग्राहकांना घरपोच पैसे काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकांनी डाक विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांचा जवळील पोस्ट कार्यालय तसेच पोस्टमनमार्फत घरपोच पैसे मिळविण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डाक अधीक्षक यु. पी. दुसाने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२५८२-२२२४२४ या क्रमांकावर संपर्क करावा. आयपीपीबीच्या अधिक माहितीसाठी www.ippbonline.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करणयात आले आहे. निशुल्क घरपोच पैसे  मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बाहेर निघण्यास बंदी असल्यामुळे अनेक नागरिक व बँक ग्राहकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे भुसावळ विभागातील सर्व उपडाकघरे, शाखा डाकघरे व येथिल प्रधान डाकघर वविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला होता. विभागांतर्गत येणाऱ्या भुसावळ, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा व बोदवड अशा सात तालुक्यातील पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएसच्या) आधारे ग्राहकांना कोणत्याही बँक खात्यातून निशुल्क घरपेाच पैसे उपलब्ध करून दिले आहेत. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसBhusawalभुसावळ