मनवेल येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:40+5:302020-12-03T04:28:40+5:30

मनवेल, ता. यावल (वार्ताहर) : येथील एका ३० वर्षीय तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

Excitement over finding a dengue patient at Manvel | मनवेल येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ

मनवेल येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ

मनवेल, ता. यावल (वार्ताहर) : येथील एका ३० वर्षीय तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आरोग्य विभागाकडून येथील २१० घरांची तपासणी करण्यात आली तर ११ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले. प्रत्येक घरोघरी जाऊन पिण्याचे पाणी व वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या साठ्याची तपासणी केली असता जंतू आढळून आल्यानंतर पाण्याच्या टाक्यांचा उपसा केला तर काही ठिकाणी औषध टाकण्यात आले.

गुरांचे हौद, पाण्याच्या टाक्यांवर झाकलेले पाहिजे, एक दिवस कोरडा पाळण्यात यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले. सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ. सागर पाटील, डाॅ. स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक संजय आहिरराव, संदीप पाटील, राजेश्वर निकुंभ, सलाउद्दीन शेख, आशा स्वयंसेविका रंजना कोळी यांनी २१० घरांची तपासणी केली.

किराणा दुकान फोडून चिल्लर लांबवली

बोदवड : शहरातील मलकापूर रस्त्यावर असलेल्या रूपम प्रोव्हिजन या किराणा दुकानाचे लहान शटर तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याची तोडफोड करत गल्ल्यातील जवळपास ३० हजारांची चिल्लर लांबवली. इतर साहित्य मात्र ‘जैसे थे’ होते. याबाबत बोदवड पोलिसात कोणतीच नोंद नाही.

Web Title: Excitement over finding a dengue patient at Manvel