शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपाध्यक्षांची सेसमधील कामे वगळली

By admin | Updated: February 3, 2015 17:20 IST

जि.प.त सध्या माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील व विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांच्यात काम वाटपावरून शीतयुद्ध सुरू आहे.

जळगाव : जि.प.त सध्या माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील व विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांच्यात काम वाटपावरून शीतयुद्ध सुरू आहे. अर्थातच माजी उपाध्यक्ष पाटील यांनी आपल्या कार्यकाळात सेस फंडातून केलेल्या कामाच्या नियोजनात विद्यमान उपाध्यक्ष आमले यांनी हस्तक्षेप करीत पाटील यांची कामे वगळली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील काही सदस्यांची कामेही त्यातून वगळण्यात आली आहेत. ७२ लाख रुपये एवढा निधी सेस फंडातून (स्वनिधी) घेऊन त्यात बांधकाम, रस्ते विकास आदी कामे माजी उपाध्यक्ष पाटील यांनी घेतली होती. त्यासंदर्भातील फायलीस प्रशासनाने मंजुरी दिली होती. परंतु उपाध्यक्ष पाटील यांचा कार्यकाळ झाल्यानंतर त्यांनी पद सोडले. नंतर उपाध्यक्षपदी आलेले आमले यांनी ७२ लाख रुपयांच्या कामांच्या नियोजनात बदल करीत माजी उपाध्यक्ष पाटील यांनी सूचविलेली काही कामे वगळली. राजेंद्र चौधरी यांची तक्रारनवीन नियोजन करीत असताना फुलगावचे जि.प.सदस्य राजेंद्र चौधरी यांची कामेही बांधकाम समितीने वगळली. मंजूर कामात ढवळाढवळ कशी झाली. बदल कसे झाले यासंदर्भातील तक्रार चौधरी यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे केली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भात जि.प.प्रशासनाशी चर्चा केली व चौधरी यांनी सूचविलेली कामे घेण्यात आली. कामे वगळल्याच्या प्रकारामुळे नाराज झालेले माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी प्रभारी अतिरिक्त सीईओंकडे नाराजी व्यक्त करून आपली कामे वगळलीच कशी असा प्रश्न केल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात माजी उपाध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.८0 लाखांचे नियोजनकाही कामे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने घेतली गेल्याने आता ८0 लाख रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. पण कुरघोडीच्या राजकारणामुळे माजी उपाध्यक्ष पाटील व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांची काही कामे वगळण्यात आली आहेत. यासंदर्भात उपाध्यक्ष आमले यांच्याशी मोबाईलवर संपर्कसाधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

-------------

सेस फंडातील ७२ लाख रुपयांच्या कामांच्या संदर्भात पुनर्नियोजनाच्या कुठल्याही प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. यासंदर्भात माझ्याकडे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली नाही. -मिनल कुटे, प्रभारी अतिरिक्त सीईओ. ७२ लाख रुपयांच्या कामांची फाईल मंजूर असताना नवीन पदाधिकार्‍यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून आपली कामे घुसविली आणि त्यास प्रशासनाने किंवा अतिरिक्त सीईओंनी मंजुरी दिली. हे कायदेशीर नाही, असा आरोप काही जि.प.सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तालयाकडे तक्रार केली जाईल, असे सदस्यांनी म्हटले आहे.