शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूरचा ‘मधुकर’ भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजी-माजी संचालकांची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 18:38 IST

मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, कामगार, वाहतूक, व्यापारी व अन्य घटकांचे मागील देणी व भविष्यात या घटकांच्या हिताचा विचार करता कारखाना भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय रविवारी आजी-माजी संचालकांच्या बैठकीत घेण्यात येऊन त्याला सहमती दर्शविण्यात आली.

ठळक मुद्दे धोरणात्मक निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवावीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी व त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आजी-माजी संचालक व परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, कामगार, वाहतूक, व्यापारी व अन्य घटकांचे मागील देणी व भविष्यात या घटकांच्या हिताचा विचार करता कारखाना भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय रविवारी आजी-माजी संचालकांच्या बैठकीत घेण्यात येऊन त्याला सहमती दर्शविण्यात आली व योग्य धोरणात्मक निर्णय घेऊन त्यासंबंधीचा निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येईल. यावर एकमत झाल.े या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते.आर्थिक अडचणींमुळे मधुकर सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होईल की नाही याबद्दल साशंकता असताना आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आजी-माजी संचालक व परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक रविवारी मधुकर कारखान्यात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम, कामगार पगार, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांची बिले, पीएफ, ठेवी अशा व अन्य अत्यावश्यक देणी अदा करणे. तसेच गाळप हंगाम २०१९-२० साठी ५० ते ५५ हजार टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. हंगाम घेणे अत्यंत कठीण असल्याने कारखान्यांपुढे कारखाना भाडेतत्त्वावर, सहयोगी तत्वावर अथवा भागीदारी तत्त्वावर देण्यासंबंधी या बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली व त्यात वरील निर्णय घेतल्याशिवाय देणी अदा करणे शक्य नसल्याचे लक्षात आणून देण्यात आलेकारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या हिताचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच त्यासाठी संबंधितांचे कायदेशीर मार्गदर्शन व धोरणात्मक मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेची संमती यावरही चर्चा झालीतसेच योग्य धोरण ठरवून पुढील बैठकीत याचा निर्णय घ्यावा, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.बैठकीस व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक नथ्थू तडवी, बारसू नेहते, लीलाधर चौधरी, सुरेश पाटील, मिलिंद नेहते, अनिल महाजन, निर्मला महाजन, शैलेजा चौधरी, प्रशांत पाटील, रमेश महाजन, नितीन चौधरी, माधुरी झोपे, शालिनी महाजन, गणेश नेहते, नरेंद्र नारखेडे, माजी आमदार तथा संचालक अरुण पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी यांच्यासह माजी संचालक भास्करराव चौधरी, नितीन राणे, चतुर्भुज खाचणे, रोहिदास ढाके, किशोर तळेले, सुरेश धनके, माजी आमदार रमेश चौधरी, उल्हास चौधरी, पुरुषोत्तम महाजन, प्रभाकर सरोदे, संजय राणे, डॉ.आर.एम.चौधरी, विश्वनाथ चौधरी, दिनकर पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक पिसाळ व सचिव तेजेंद्र तळेले आदी उपस्थित होते.या बैठकीला विभागाच्या खासदार रक्षा खडसे, विद्यमान आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार तथा कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची उपस्थिती राहणार होती. मात्र काही कारणास्तव तिघेही अनुपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीFaizpurफैजपूर