शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

२४ रोजी नगराध्यक्ष निवड

By admin | Updated: June 16, 2015 14:52 IST

नंदुरबारसह नवापूर व तळोदा नगराध्यक्ष निवडीसाठी २४ जून रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. २0 पासून अर्ज दाखल करता येणार आहे.

नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा नगराध्यक्ष निवडीसाठी २४ जून रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. २0 पासून अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान, तिन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता असल्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता आहे.तिन्ही नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २५ जून रोजी संपत असल्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी २४ जून रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २0 जूनपासून नामांकनपत्र दाखल करता येणार आहेत. आवश्यकता वाटल्यास २४ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून राहणार आहेत.नंदुरबार पालिकेत काँग्रेसची एकतर्फी सत्ता आहे. ३७ पैकी ३६ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. त्यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी जो उमेदवार देतील त्यांचीच नगराध्यक्षपदी निवड होणार आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्याने विद्यमान नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी याच कायम राहण्याची शक्यता आहे.तळोदा पालिकेतदेखील काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणीही सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. तळोद्यात दोन जण इच्छुक आहेत. त्यात विद्यमान नगराध्यक्षा रत्ना चौधरी व सकिराबी सैयद यांचे नाव चर्चेत आहे. अंतिम क्षणी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे लक्ष लागून आहे.नवापूर पालिकेतदेखील काँग्रेसची सत्ता आहे. १८ पैकी १३ काँग्रेसचे व एक अपक्ष असे एकूण १४सदस्य काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे या ठिकाणीही एकतर्फीच निवड होण्याची शक्यता आहे. येथेही नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यासाठी चार जण इच्छुक आहेत. त्यात विद्यमान उपनगराध्यक्षा ज्योती दीपक जयस्वाल, रशिदा शेख आरिफ, मेघा हेमंत जाधव व रेणुका विनय गावीत यांचा समावेश आहे. यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागून आहे