शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने केळी बागांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 04:28 IST

केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

किरण चौधरी रावेर (जि. जळगाव) : गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे घटलेले केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा भाव आहे मात्र पीकच आलेले नाही, अशी स्थिती केळी उत्पादकांची झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादकांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे.गेल्यावर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत ट्युबवेल व विहीरींची पातळी तब्बल १०० मीटरच्या खाली घसरली होती. उन्हाळ्यात अतिउष्ण तापमानामुळे केळीबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या होत्या. देशभरातील तीन चतुर्थांश केळी उत्पादन रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा परिसरात होते. उत्पादनाअभावी यंदा केळीचे बाजारभाव १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. तुरळक शेतकऱ्यांना बाजारभावांचा लाभ झाला असला तरी, हाती उत्पादनच नसल्याने केळीचे विक्रमी बाजारभाव शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले नाहीत.जुलै ते नोव्हेंबर दरम्यान सातत्याने ढगाळ वातावरण व संततधार पाऊस सुरू होता. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पीक वाढीची प्रक्रिया खुटली. शेतजमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने वाफसा होवू शकला नाही. त्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत ओलावा राहिल्याने केळीच्या मुळांचीही वाढ खुंटली आहे.>खरेदीला व्यापाºयांची नाकेळी बागांवर करपा घोंघावत आहे. केळीबाग उपटून फेकाव्या लागल्या आहेत. केळीच्या घडांवर व दांड्यावर ‘पीटस्पॉट’ रोगाचा प्रादुर्भाव होवून काळे ठिपके पडत आहेत. त्यामुळे केळी अपरिपक्व अवस्थेत पिकत असल्याने खरेदीला व्यापारी नकार देत आहे.>जुलै महिन्यापासून सतत पाच महिने ढगाळ वातावरण व पावसामुळे पाण्याचा निचरा न होणाºया जमिनीत वाफसा झाला नाही. करपा, पीटस्पॉट व सीएमव्हीची लागण झाल्याने केळीच्या उत्पादनासह गुणात्मक दर्जावरही परिणाम झाला आहे.- डॉ. के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ, जळगावकेळी निसवल्याने व सकाळी थंडीमुळे केळी पानांवर दवबिंदू राहत आहेत. करपा निर्मुलनाच्या फवारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे- सदानंद महाजन, निर्यातक्षम केळी उत्पादक, तांदलवाडी