शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.उल्हास पाटील यांच्याकडून डॉ.केतकी व डॉ.अनिकेतकडे वैद्यकीय सेवेचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:45 IST

- विजयकुमार सैतवाल उद्योजकाची मुलं उद्योजक होतात, अभिनेत्याची मुलं अभिनेते होतात, वकीलाची मुलं वकील होतात, शिक्षक, प्राध्यापकाची मुलं शिक्षक ...

- विजयकुमार सैतवालउद्योजकाची मुलं उद्योजक होतात, अभिनेत्याची मुलं अभिनेते होतात, वकीलाची मुलं वकील होतात, शिक्षक, प्राध्यापकाची मुलं शिक्षक किंवा प्राध्यापक होतात अशाच प्रकारे डॉक्टरांची मुलं ही डॉक्टर होतात, हे सारं स्वाभाविक असले तरी मागच्या पिढीचा वसा जपण्याची संस्कृती आपल्या भारतीय परंपरेत जोपासली जाते. जळगाव शहराच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात असेच एक स्वतंत्र ओळख असलेले कुटुंब आहे, ते म्हणजे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे. त्यांचा वारसा आता डॉ.केतकी व डॉ.अनिकेत पुढे नेत आहेत.सन १९९६ मध्ये गोदावरी फाउंडेशनचे छोटेसे रोपटे आपल्या आईच्या नावाने डॉ. उल्हास पाटील यांनी लावले. जळगाव जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण देशाला शैक्षणिक व वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देताना आईने दिलेला शिक्षणाचा वसा-वारसा म्हणून पुढे चालवला व यशस्वी केला. आज आपल्या आई वडिलांच्या पावलावर- पाऊल ठेवून डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील वारसा म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळत पुढे नेत आहे.जळगाव जिल्ह्यात अनेक व्यावसायिक यशस्वी कुटुंबे आहेत. या कुटुंबातील प्रमुखाने सुरू केलेले व्यवसाय यशस्वीपणे पुढे चालू ठेवणारे वारसही आहेत. यात प्रामुख्याने गोदावरी फाउंडेशनचे नाव घेतले जाते.आई-वडील शिक्षक, घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मुलाला डॉक्टरच करायचे असा ध्यास घेतलेल्या गोदावरी पाटील यांनी डॉ. उल्हास पाटील यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.आईने दिलेला शिक्षणाचा हा वसा, वारसा म्हणून बघताना आईची आठवण सतत राहावी हाच उद्देश ठेवून गोदावरी प्रसुतीगृह नावाचे छोटे रुग्णालय देखील जळगावात सुरू केले.स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने आईला मातृत्व मिळवून देण्यासाठी अंगी असलेले कसब व हुशारी तसेच उपलब्ध साधनांचा खुबीने उपयोग केला. अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना तान्हुल्या बाळाचीही सुरक्षितता सांभाळत व्यवसाय नाही तर सेवा भाव जोपासला आणि म्हणूनच यशाची ही घोडदौड वैद्यकिय क्षेत्रापुरता मर्यादीत न ठेवता याच लहान बाळांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळून ते जबाबदार नागरिक व्हावे हे आव्हान शैक्षणिक क्षेत्रात अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत गोदावरी फाउंडेशनचे हे छोटेसे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत झाले.या वटवृक्षाची सावली कमी न होऊ देण्याची जबाबदारी डॉ. केतकी पाटील यांनी स्वीकारली आहे. रेडिआॅलॉजिस्ट असलेल्या डॉ. केतकी पाटील यांनी घर सांभाळून रूग्णालयाच्या कामातही लक्ष घातले आहे.डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला अत्याधुनिक स्वरूपाची सेवा आणि उपचार मिळण्यासाठी डॉ. केतकी या नेहमीच आग्रही राहतात. डॉ. उल्हास पाटील यांच्या राजकीय वारसदार म्हणूनही डॉ. केतकी पाटील यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणाच्या माध्यमातूनही समाजकारण करता येते असा वडीलांचा स्वभावगुण लक्षात घेत डॉ. केतकी यांची पाऊले आता राजकीय क्षेत्रातही पडू लागली आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवातही केली आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्राचा वारसाही डॉ. केतकी पाटील यांनी जोपासला आहे. वैद्यकीय क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र ही दोन्ही क्षेत्रे जनसेवेची आहेत. डॉ. उल्हास पाटील यांनी या दोन्ही क्षेत्रात नाव कमाविले आहे. आता त्यांचाच वारसा पुढे चालवून वडिलांचे नाव आणि घराण्याची ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी डॉ. केतकी पाटील या यशस्वीपणे पार पाडत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव