शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जलशक्ती अभियान कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 23:41 IST

मोबाईवर बोलणे खटकले। आमदार जावळे यांनी व्यक्त केली नाराजी

यावल : यावल येथे आयोजित जलशक्ती अभियान कार्यशाळेत गांभीर्याने सुरू असलेल्या चर्चेप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे दोन वेळा मोबाईलवर बोलत असल्याने महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी त्यांना खडसावत अगोदर मोबाईल बंद करा कार्यशाळेचा आपणास गांभीर्य नाही काय? असा विचारत खडसावले.यावल येथे शनिवारी धनश्री चित्रमंदिरात जलशक्ती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार रक्षा खडसे, महाराष्टÑ राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, ज़ि प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची उपस्थिती होती.केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलले जलशक्ती अभियान लोकसहभागाशिवाय पुर्ण होणार नाही. जिल्हयात फक्त यावल-रावेर या दोनच तालुक्यात हे अभियान राबविले जात आहे त्याचे कारण या दोन तालुक्यातील भुगर्भातील जलपातळी ही चिंतेची बाब असल्याने अभियान राबविण्यासाठी प्रत्येक नागरीकांसह गावपातळी व तालुका पातळीवरील पदाधिका-यांनी सहकार्य करून यशस्वी करावे असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी या कार्यशाळेत केले. यावल-रावेर तालुक्यातील पाणी पातळीची समस्या गंभीर आहे त्या दृष्टीने आणि भावी पिढीसाठी ही योजना यशस्वी करण्यासाठी गावतपातळीवरील पदाधिका-यांनी तसेच विविध संस्थांनी सहभागी होवून ती यशस्वी करावी, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.दोन तालुक्यात भीषण स्थितीप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल-रावेर तालुक्यातील भुगर्भातील जलपातळीची भीषणता व्यक्त करतांना सांगीतले की, गेल्या काही वर्षापासून पाण्याअभावी केळी उत्पादक ऐन हंगामातील केळी उपटून फेकत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावे लागत आहे. यासह त्यांनी आज आणि उद्यासाठी हे अभियान राबविणे महत्वाचे आहे.जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जलशक्ती अभियानाचे महत्व आपल्या भाषणात विषद केले.कार्यशाळेत भूजल परीक्षण विभाग, कृषी विभाग, वनविभाग, फैजपुर नगरपालीका या विविध कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजना चित्रफितीव्दारे दाखविण्यात आल्या. ज़ि प. सदस्य प्रभाकर सोनवणे, ज़ि प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, डांभुर्णी सरपंच पुरूजीत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर ज़ि प. सदस्य रविंद्र पाटील, सविता भालेराव, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, प. स. सदस्य दिपक पाटील, तर कार्यकमास नगरसेवक , तालुक्यातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पं. स. सदस्य, राजकीय पदाधिकारी व विविध यंत्रणा प्रमुख व जलशक्ती अभियानाचे संबधित सर्व प्रमुख उपस्थित होते.मग कार्यशाळेचा आयोजन कशासाठीआमदार हरीभाऊ जावळे हे मनोगत व्यक्त करत असताना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचा उल्लेख करून दोन वेळा बरं का जिल्हाधिकारी साहेब , बरं का जिल्हाधिकारी साहेब असे केळी उत्पादकांच्या परिस्थितीची माहिती देतांना म्हणाले, मात्र याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते ते मोबाईलवर बोलण्यात मग्न असल्याचे लक्षात येताच आमदार जावळे यांनी अहो कलेक्टर साहेब तुम्ही पहिल्यांदा मोबाईल बंद करा कार्यक्रमात मी पाहतो आहे तुम्ही सारखे मोबाईलवरच बोलत आहात मग या कार्यशाळेचे आयोजन कशाला पाहीजे असे म्हणून खडे बोल सुनावले. आमदारांचा नाराजीची सुर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी ढाकणे यांनी तात्काळ मोबाईल बंद केला.