जळगाव- जागतिक हिंदी दिवसानिमित्त सप्टेंबर महिन्यात मू़जे़ महाविद्यालयाच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती़ या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी पारितोषिक वितरण करण्यात आले़या स्पर्धेत हिंदी विभागाचे पदवुत्तर विद्यार्थी हिरामण पाटील, अरुणा सारस्वत, लीना राजपूत, करिश्मा पाटील, पूजा गुरवे, अक्षय घुमरे, जागृती बारी, तदवी पाकिजा महमूद, मोनाली सपकाळे, प्रेरणा संजय पाटील या विद्यार्थ्यांनी प्रथम तथा द्वितीय क्रमांक पटकाविला. दरम्यान, या सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. व्यासपीठावर बँक आॅफ बडोदाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अरुण मिश्रा, राजभाषा अधिकारी सुकन्या देवी, प्रा.डॉ. सुरेश तायडे, एकलव्यचे श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा. विजय लोहार उपस्थित होते. यावेळी विद्याथीर्नी किरण नंदुरबारे यांच्यासह विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:36 IST