पाण्यात बुडणा:याला काढण्यासाठी केलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: June 24, 2017 12:23 IST2017-06-24T12:23:34+5:302017-06-24T12:23:34+5:30

मोर धरणाजवळील कु:हाड डोहातील घटना

Dip in water: Due to the drowning of Ishmaq, which is made to remove it | पाण्यात बुडणा:याला काढण्यासाठी केलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

पाण्यात बुडणा:याला काढण्यासाठी केलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

ऑनलाईन लोकमत

फैजपूर,दि.24 : डोहात बुडालेल्या इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या जाबांज चांदखॉ तडवी या इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मोर धरणानजीकच्या कु:हाड डोहात शुक्रवारी सकाळी घडली़ या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी संतप्त होत फैजपूर पोलीस ठाणे गाठल़े पोलिसांनी त्यांची समजूत काढल्याने जमाव शांत झाला़
बोरखेडा शिवारातील मोर धरणाच्या कु:हाड डोहात गौतम सुपडू राणे (35, रा.विवरे बु.।।, ता.रावेर)  यांचा गुरुवारी 11 वाजता मृत्यू झाला होता़ गौतम राणे यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी फैजपूरचे जाबांज चांदखाँ तडवी हे शुक्रवारी गेल्यानंतर त्यांचाही डोहात बुडाल्याने मृत्यू झाला़ शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी  सकाळी काही वेळ पोलीस ठाण्यात येऊन संताप व्यक्त केला  मात्र त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी समजूत काढल्याने जमाव शांत झाले. जाबांज तडवी यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Web Title: Dip in water: Due to the drowning of Ishmaq, which is made to remove it