शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यात हरणांच्या कळपाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:09 IST

हरणांच्या कळपाने रस्त्याने मोटारसायकलवर येणाऱ्या तीन जणांना धडक दिली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले

ठळक मुद्दे चिंचखेडा खुर्द गावाजवळील घटनाचिंचखेडा खुर्द : दोन गंभीर, एक किरकोळ जखमी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : हरणांच्या कळपाने रस्त्याने मोटारसायकलवर येणाऱ्या तीन जणांना धडक दिली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, तिसरा किरकोळ जखमी आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचखेडा खुर्द गावाजवळील नाल्याजवळ कुºहा खांडवी रस्त्यावर घडली.सूत्रांनुसार, तालुक्यातील कुºहा काकोडा येथील दिलीप महादेव गोसावी, गणेश अशोक गोरले व विजय नंदेवार हे तीन जण खामगाव येथून मोटार सायकलने कुºहा येथे येत होते. ते येत असताना शनिवारी रात्री अचानक हरणांचा कळप त्यांना रस्त्यात आडवा आला. यामुळे मोटारसायकलवरील तिघे जण थांबले. हरणांचा कळप आणि मोटारसायकलस्वार आमने-सामने आले. चारही बाजूंनी असलेल्या हरणांनी मोटारसायकलस्वारांना धडक दिली. त्यात तिघेही जखमी झाले. त्यातील दिलीप महादेव गोसावी (वय ३५), तर गणेश अशोक गोरले (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून, विजय नंदेवार हे किरकोळ जखमी झाले.हरणांनी धडक दिल्यानंतर बराच वेळ ते रस्त्यावरच जखमी अवस्थेत बेशुद्धावस्थेत पडून होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना उचलून वढोडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणले. परंतु हे उपकेंद्रही बंद होते. यानंतर ग्रामस्थांनी त्यांना मलकापूर येथे खासगी रुग्णालयात हलविले.जखमींची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने दोघे घरी परतले. अशा परिस्थितीत वनविभागाने जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांसह नागरिकांनी केली आहे.कुºहा ते खांडवी रस्त्यावर मुक्ताईनगर तालुका अंतर्गत येणारे वढोदा वनपरिक्षेत्र आहे. यामुळे या रस्त्यावर वन्यजीव प्राण्यांची नेहमीच वर्दळ असते. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतांचे नुकसानदेखील वन्य प्राण्यांमुळे होत असते. तसेच हरिण, सांबर, काळवीट यासारखे तृणभक्षी प्राणी हे रस्ता ओलांडून दुसºया शेतांमध्ये जात असताना असे प्रकार अनेक वेळेस घडत आहेत.