शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँक, पोस्ट कार्यालय व रेल्वे स्टेशनवर 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार

By admin | Updated: May 29, 2017 18:08 IST

ग्राहकांची गैरसोय : महाराष्ट्र बँकेत 100 रुपयाला पाच रुपये ‘चाजर्’

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.29 - दहा रुपयांचे नाणे ग्राहकांकडून घेतले  जात नसल्याने नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे. स्टेट बँक, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन या ठिकाणी नाणे स्वीकारले जात नसल्याचे ‘लोकमत’ केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्य उघड झाले आहे. महाराष्ट्र बँकेच्या नवीपेठ शाखेत तर चक्क दहा रुपयाचे नाणे असल्यास 100 रुपयाला पाच रुपये प्रमाणे चार्ज लागेल असे सांगण्यात आल़े
दुकानदार, पानटपरीधारक यांच्याकडे मोठय़ा प्रमाणावर जमा झालेली 10 रुपयांची नाणी बँकामध्येही स्वीकारली जात नसल्याची स्थिती आह़े तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने नागरिकासमोर दहा रुपयांचे नाणे एक-एक करून खर्च करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही़ याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, महावितरण, बसस्टॅण्ड याठिकाणी दहा रुपयांचे नाणे किती व कसे स्वीकारले जातात याबाबत स्टिंग केले असता बँकाकडून नाणे घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.
स्टेट बँक म्हणते आम्हालाच ग्राहकांना सुटे पैसे खपवायचेय
‘लोकमत’ प्रतिनिधीने दहा रुपयांच्या नाण्यांबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखा गाठली़ दहा रुपयांचे दोन हजाराचे नाणे जमा करायचे आहेत, घेणार का? असा प्रश्न  कॅशिअरला केला असता नाणे घेण्यास स्पष्ट नकार दिला़ आमच्याकडे मोठय़ा प्रमाणावर दोन रुपये, पाच व दहा रुपयांची चिल्लर ग्राहकांना खपविण्यासाठी आली आह़े त्यामुळे आम्ही तुमच्याकडून दहा रुपयांची चिल्लर घेऊन शकत नाही़ तुमचे महाराष्ट्र बँकेत खाते आहे ना? मग त्यांना चिल्लर घेण्याबाबत सांगा, जर ते घेत नसतील तर लेखी लिहून घ्या किंवा रिझव्र्ह बँकेला फोन लावतो म्हणून सांगा, असा सल्ला येथील कॅशिअरने दिला़