रिक्षात बसलेल्या एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:38 IST2019-12-03T21:37:29+5:302019-12-03T21:38:12+5:30

अकस्मात मृत्युची नोंद

Death of one sitting in space | रिक्षात बसलेल्या एकाचा मृत्यू

रिक्षात बसलेल्या एकाचा मृत्यू

जळगाव- रिक्षात असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाल्मिकनगरातील उद्यानाजवळ घडली़ जितेंद्र उत्तम कोळी (वय-४०, रा़ वाल्मिकनगर) असे मयताचे नाव आहे़
जितेंद्र कोळी हे मिळेल त्या वाहनावर चालक म्हणून रोजंदारीने काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचे. मंगळवारी दुपारी ते वाल्मिकनगरातील मारोती मंदिर जवळील बगिच्यात पार्कींग केलेल्या रिक्षात जितेंद्र कोळी बसले होते. ते बसलेल्या अवस्थेत काहीच बोलत नसल्याचा प्रकार दुपारी ०३.१५ वाजता होमगार्ड विकास जोहरे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी माहिती घेऊन जितेंद्र कोळी यांच्या कुटुंबीयांना प्रकार कळविला. नातेवाईकांनी याठिकाणी धाव घेत अत्यवस्थ अवस्थेत त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले असता तपासणीअंती डॉक्टरांनी जितेंद्र यांना मृत घोषीत केले. जितेंद्र यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगी ऋचिका असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास राजेंद्र कोलते हे करीत आहेत.

Web Title: Death of one sitting in space

टॅग्स :Jalgaonजळगाव