अमळनेरात पतीच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 21:34 IST2021-03-29T21:33:00+5:302021-03-29T21:34:47+5:30
पतीच्या निधनानंतर पत्नीचेही निधन झाल्याची अमळनेर येथे सोमवारी घडली.

अमळनेरात पतीच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचाही मृत्यू
अमळनेर : पतीचा कोरोनाने मृत्यू होऊन अंत्यसंस्कार झाल्याची बातमी कळताच पत्नीचाही मृत्यू झाल्याची घटना शहरातील शिवशक्ती चौकात सोमवारी घडली.
शिवशक्ती चौकात राहणारे राजधर नथ्थु निकम याना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ रोजी पहाटे पाचला त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे त्यांच्या पत्नीला न सांगता नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. घरी आल्यानंतर घटना पत्नीला कळवण्यात आली. अन पतीच्या मृत्यूचा धसका घेत पत्नी विमलबाईदेखील बेशुद्ध पडल्या. तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
राजधर निकम यांच्यावर सकाळी अकराला अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विमलबाई यांच्यावर सायंकाळी सहाला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चार मुली आणि एका मुलाने अग्निडाग दिला. राजधर निकम हे मूळचे वडजाई, ता.भडगाव येथील रहिवासी होते. ते एसटी महामंडळात हेल्पर म्हणून नोकरीला होते.