चारचाकी चोरणारी दाऊद टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:47+5:302021-08-26T04:20:47+5:30

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात काच फोडून चारचाकी चोरणाऱ्या दाऊद टोळीतील शेख झिशान दाऊद (वय २७, रा. धाड करडी, जि. ...

David's gang arrested for stealing four-wheelers | चारचाकी चोरणारी दाऊद टोळी जेरबंद

चारचाकी चोरणारी दाऊद टोळी जेरबंद

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात काच फोडून चारचाकी चोरणाऱ्या दाऊद टोळीतील शेख झिशान दाऊद (वय २७, रा. धाड करडी, जि. बुलडाणा) व शेख सद्दाम शेख कदीर (वय २५, रा. घाटनांद्रा, ता.जि. बुलडाणा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जामनेर व पहूर येथून चोरलेल्या दोन कार हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या दोघांनी जळगावसह अकोला, वाशीम, जालना, हिंगोली, नांदेड ग्रामीण व औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक कार चोरी केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील पहूर व जामनेर येथील कार चोरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, शरिफोद्दीन काझी, वसंत लिंगायत, युनूस शेख, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, मुरलीधर बारी व अशोक पाटील यांचे पथक रवाना केले होते. बुलडाणा येथून ६ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या कार जप्त केल्या.

Web Title: David's gang arrested for stealing four-wheelers