मृतदेह पुरण्यास विरोध करणा-या 9 जणांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 1, 2017 17:18 IST2017-05-01T17:18:38+5:302017-05-01T17:18:38+5:30

मृतदेह पुरण्यास विरोध केल्याच्या कारणावरून यावल येथे रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील दोन गटात वाद झाला .

Crime against 9 people protesting against burial | मृतदेह पुरण्यास विरोध करणा-या 9 जणांविरुद्ध गुन्हा

मृतदेह पुरण्यास विरोध करणा-या 9 जणांविरुद्ध गुन्हा

ऑनलाइन लोकमत

यावल, दि. 1 - मृतदेह पुरण्यास विरोध केल्याच्या कारणावरून रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील दोन गटात वाद झाला . या वादाचं पर्यावसान मारहाणीत झाल्यानं दुस-या गटातील एक जण गंभीर जखमी झाला असून सहा जण किरकोळ जखमी झालेत. 
 
याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री येथील ख्वाजा मज्जीत आवारातील परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पुरण्यास  एका गटाने विरोध केल्याच्या कारणामुळे दोन गटांत हाणामारी झाली.
अखेर मृतदेह  सातोद रस्त्यावरील स्मशनात नेऊन पुरण्यात आला. या घटनेमुळे झालेल्या मारहाणीत सोहेब खाटीक हा तरुण जखमी झाला आहे.  
 
दरम्यान, हाणामारीमुळे परिसरात काही काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता येथील वातावरण नियंत्रणात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना समज दिली आहे. 

Web Title: Crime against 9 people protesting against burial