शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

हिवाळा सुरू होताच बाजारपेठेला ‘कॉस्मेटिक लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:25 PM

विंटर केअर : बॉडी लोशन, कोल्डक्रीम, पेट्रोलियम जेलीला मागणी

जळगाव : हिवाळा सुरू झाला की काळजी सुरू होते ती त्वचेची. त्वचेच्या या काळजीसाठी थंडीच्या चार महिन्यात बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, मॉईश्चराईजर, पेट्रोलियम जेली यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढून वर्षातील इतर ऋतूंपेक्षा या ऋतूत विविध प्रकारच्या कॉस्मेटिकची सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे थंडीचे हे दिवस जणू ‘कॉस्मेटिक सिझन’ बनून जातात.वर्षभर तशी कॉस्मेटिकची मागणी असते. मात्र उन्हाळा व पावसाळ्यापेक्षा सर्वाधिक कॉस्मेटिकची विक्री होते ती हिवाळ्यात. थंडीमध्ये त्वचेच्या काळजीसाठी पूर्वीपासूनच वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. यामध्ये सर्वाधिक वापर व्हायचा तो पोमेडचा. आबालवृद्धांपासून सर्वच जण पोमेटचा वापर करायचे.मात्र गेल्या दशकभरात हे चित्र पूर्णत: बदलले असून पोमेटची जागा विविध प्रकारच्या बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, मॉईश्चराईजर, पेट्रोलियम जेलीने घेतली आहे. यांनी केवळ जागाच घेतली असे नाही तर अख्खे ‘मार्केटच’ काबीज केले आहे. यामध्ये सुरुवातीला काही ठराविक कंपन्या होत्या, मात्र आता एक-दोन नव्हे तर अर्धा डझनहून अधिक कंपन्या यात उतरल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना ‘रिस्पॉन्सही’ मोठा आहे. आधी केवळ एका प्रकारचे हिवाळी ‘कॉस्मेटिक’ तयार करणाऱ्या कंपन्यांनी वेगवेगळे ‘फ्लेवर’ आणले आहे. त्यामुळे बाजारात याची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी त्या-त्या त्वचेनुसार ‘कॉस्मेटिक’ उपलब्ध आहेत. त्वचेच्या या काळजीमुळे बाजारपेठेत दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये केवळ महिलांची मागणी आहे असे नाही तर पुरुषही यात मागे नाही. एकूण मागणीमध्ये ६० टक्के महिला आहे, तर ४० टक्के पुरुष आहेत.‘विंटर सोप’लाही मागणीथंडीमध्ये वेगवगळ्या साबणांची मागणी होते़ याते ग्लिसरिनयुक्त साबणाचा वापर अधिक केला जातो.-पोमेटची जागा घेतलेल्या हिवाळी ‘कॉस्मेटिक’मध्ये पेट्रोलियम जेलीनंतर आलेले बॉडी लोशन ग्राहक केवळ शरीरापुरते मर्यादित ठेवत असून चेहºयासाठी कोल्ड क्रीमचा वापर करीत आहे.-महिलांची अधिक ‘चॉईस’ असते. कोरडी, तेलकट व मध्यम या तीनही प्रकारच्या त्वचा रुक्ष पडतात. त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहे.-आॅक्टोबर ते जानेवारी असा हिवाळी ‘कॉस्मेटिक’चा ‘सिझन’ असून गेल्या काही वर्षांपासून त्याची दणक्यात विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदाही चांगली मागणी असून दरवर्षी ही मागणी वाढतच असल्याचे सांगण्यात येत आहे.-सुरुवातीला दुकानात एका कपाटात हे साहित्य बसत होते; मात्र आता त्यासाठी १० कपाट असले तरी माल कोठे ठेवावा? असा प्रश्न विक्रेत्यांना पडत आहे.-त्वचेच्या काळजीसाठी बाजारात एवढ्या वस्तू असताना ओठांची काळजी मागे कशी राहणार? ओठांच्या काळजीसाठीही बाजारात विविध ‘लिप केअर’ उपलब्ध आहेत. त्यातही दरवर्षी आधुनिकता येत आहे.पोमेटचा केवळ १० टक्केच वापरत्वचेच्या काळजीसाठी पोमेटचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. हातापायासह चेहरा, ओठालाही पोमेटच लावले जायचे. मात्र आता हातापायासाठी लोशन आले आहे, तर चेहºयासाठी स्वतंत्र कोल्ड क्रीम आल्या आहेत. पूर्वी आबालवृद्ध वापरत असलेच्या पोमेटचा आता केवळ १० टक्केच वापर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.विंटर केअरची रेंजपेट्रोलियम जेली- २० ते १०० रुपयेबॉडी लोशन- १० ते २०० रुपयेमॉईश्चराईझर- ४० ते २५० रुपयेकोल्ड क्रीम- २० ते १०० रुपयेपोमेट- ४५ रुपयांपासून 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव