The Constitution made every Indian independent | संविधानामुळे प्रत्येक भारतीय स्वतंत्र्य झाला
संविधानामुळे प्रत्येक भारतीय स्वतंत्र्य झाला

जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संविधानामुळेच प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य झाला आहे, असे मत आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांनी संविधान जागर बैठकीत केले. अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे होते.
पद्मालय शासकीय विश्रामगृहात लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान जागर समितीची रविवारी झाली. दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजनासह प्रजासत्ताक दिनापर्यंत संविधान जागर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शाळेत संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन व्हावे, संविधानवर आयोजित स्पर्धा परीक्षेचे आयोजन, परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.
भारतीयांचे हक्क व अधिकार धोक्यात सापडले असून संविधानाची जपवणूक करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला त्याचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा विचार बैठकीत व्यक्त झाला.
यावेळी प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.प्रकाश कांबळे, जयसिंग वाघ, रविकिरण बिºहाडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत अशपाक पिंजारी, अमोल कोल्हे, सचिन धांडे, अनिल नाटेकर, शिवराम पाटील, ईश्वर मोरे, विश्वास बिºहाडे, भारत सासणे, गुरूनाथ सैंदाणे , दिलीप सपकाळे यांनी सहभाग घेतला.
बैठकीत सुरेंद्र पाटील, चंदन बिºहाडे, राजेंद्र गडवे, दिलीप अहिरे, बाळासाहेब उदय सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, गमीर शेख, सुजात ठाकूर, कविता सपकाळे, मिलिंद सोनवणे, राहुल भालेराव, नाना मगरे, प्रदीप सोनवणे, संतोष गायकवाड, मुकेश कुरील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़

Web Title: The Constitution made every Indian independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.