शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
5
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
6
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
7
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
8
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
9
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
10
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
15
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
16
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
17
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
18
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
19
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची अनिल चौधरींविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 01:16 IST

कायदेशीर कारवाईसाठी निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविले पत्र

भुसावळ :  माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी २०१९ च्या रावेर विधानसभा निवडणुकी करिता नामनिर्देशन पत्रात  खोटी माहिती दिली. त्यांनी त्यांच्यावरील फौजदारी खटल्यांसंदर्भातही माहिती दिली नाही.  त्यांनी अपूणर्ण वचुकीचे शपथपत्र दाखल केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दीपक पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार पत्राद्वारे केली आहे.

या पत्रानुसार माहिती अशी की अनिल चौधरी यांनी २०१९ रावेर विधानसभा निवडणुकी करीता नामनिर्देशन पत्र सादर करत असतांना नमुना २६ (नियम -४ अ) नुसार सादर केलेली माहिती देताना कलम ५ मध्ये  फौजदारी खटल्या संबंधी   माहिती देताना खरी माहिती न देता अपूर्ण माहिती व खोटे शपथपत्र दाखल  केले.  याबाबत शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी दीपक पाटील यांनी तक्रार केली आहे.

चौधरी यांच्या बदनामीसाठी षडयंत्र - ॲड. शर्मा  
भुसावळ : राजकीय षड‌्यंत्राला बळी पडावे, यासाठी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अशी माहिती त्यांचे वकील ॲड. राजेश शर्मा यांनी  पत्रपरिषदेत दिली.  चौधरी यांच्याविरोधात ममता सनांसे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौधरी यांनी त्यांना त्यांच्या मालकीचे पाच गाळे विक्रीचे आमिष दाखवले व त्यांच्याकडून ६० लाख ७० हजार रुपये घेऊन फसवणूक केली असा आरोप केला आहे. मात्र  अनिल चौधरी यांच्या वतीने त्यांचे वकील  शर्मा यांनी  आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, चौधरी यांनी त्यांचे  गाळे आयसीआयसी बँकेच्या ताब्यात दिले होते. तर, सनांसे यांच्याकडून घेतलेले पैसे हे उसनवारीसाठी घेतले होते. मात्र, त्यांनी कोऱ्या कागदावर अनिल चौधरी यांची स्वाक्षरी घेत बनावट खरेदीखत सादर केले असून यावर चौधरी यांनी पोलिसात तानाजी पाटील, सुधाकर सनांसे आणि ममता सनांसे यांच्याविरोधातफसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून अद्यापही यावर कारवाई होत नसल्याने चौधरी यांनीदेखील प्रतिदावा दाखल केला आहे. 

हे आहेत तक्रारीतील मुद्दे
चौधरी यांचा रहिवास भुसावळचे येथे असून त्यांनी शपथपत्रात पत्ता स्टेशन रोड, मराठा मंगल कार्यालय जवळ मानकर प्लॉट रावेर असा दर्शविला. शपथपत्रात  कलम पाच मध्ये सादर केलेली माहितीही अपूर्ण असून त्यात केवळ एकूण नऊ केसेस असल्याची माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल आहे मात्र त्यांनी ती माहिती लपवलेली आहे.

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या दाखल गुन्ह्यात त्यांना ११/९/२०१२ रोजी शिक्षा झाली होती. याचबरोबर इतर पाच गुन्हे जे दाखल असताना दर्शविले नाही. याची यादी तक्रार पत्रात दिली आहे. भुसावळला एका महिलेची  गाळे प्रकरणी सुद्धा फसवणूक केली असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.