शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपासून पाचवी ते आठवी वर्ग भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 20:15 IST

दहा महिन्यानंतर शाळेची घंटा वाजणार : पालकांचे संमतिपत्र आवश्यक

जळगाव : कोरोनामुळे बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांची घंटा तब्बल दहा महिन्यानंतर वाजणार आहे़ बुधवार, २७ जानेवारीपासून हे वर्ग सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली होती. आता स्थानिक प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे़ त्यामुळे आता पुन्हा पाचवी ते आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते़ त्यामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता दुस-या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ करण्याससुध्दा परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे का, शिक्षक किंवा कर्मचारी विलगीकरण कक्षात आहे का, याची खात्री करण्याची सूचना शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिका-यांना देण्यात आली आहे.सुरक्षित अंतर ठेवावेपाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे वर्गांची स्वच्छता करण्यात आली आहे की नाही, थर्मोमिटर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे की नाही, याचीसुध्दा गटशिक्षणाधिका-यांना खात्री करावयाची आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर ठेवून बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालकांचे संमतिपत्रसुध्दा भरून घेतले जाणार आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव