शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. ...

जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीतर्फे जळगाव ते मुंबई विमानसेवा पुरविण्यात येत आहे. उड्डाण योजने अंतर्गंत ही सेवा असल्यामुळे, कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा नियमित सुरू होती. मात्र, गेल्या महिन्यात विमान कंपनीतर्फे विमानाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे ही सेवा एक महिना बंद ठेवण्यात आली होती. मात्र, विमानाचे तांत्रिक काम पूर्ण झाल्यामुळे, १४ जुलैपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी मुंबईहून जळगाव इतके प्रवासी जळगावला आले व जळगावहून इतके प्रवासी मुंबईला रवाना झाले, तर मुंबईहून इतके प्रवासी जळगावला आले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून विमानाच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.

इन्फो :

असे आहे सुधारित वेळापत्रक

विमान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार सध्या आठवड्यातून तीनच दिवस विमानसेवा सुरू असल्यामुळे, दर बुधवारी व शनिवारी अहमदाबादहून जळगावसाठी दुपारी दोन वाजता विमान निघणार आहे. जळगावला हे विमान साडेतीन वाजता आल्यानंतर, या ठिकाणाहून मुंबईसाठी पावणे चार वाजता निघून, मुंबईला सायंकाळी पाच वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून साडेपाच वाजता निघून, जळगावला पावणे सात वाजता येणार आहे आणि जळगावहून पुन्हा अहमदाबादसाठी सायंकाळी सव्वा सात वाजता निघणार आहे.

तसेच या विमानसेवेच्या रविवारच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दर रविवारी हे विमान जळगावसाठी अहमदाबादहून सकाळी पावणे दहा वाजता निघून, जळगावला सव्वा अकरा वाजता येणार आहे, तर जळगावहून मुंबईसाठी पावणे बारा वाजता निघून, मुंबईला एक वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून दीड वाजता निघून जळगावला पावणे तीन वाजता येणार आहे आणि जळगावहून सव्वा तीन वाजता अहमदाबादकडे रवाना होणार आहे.

इन्फो :

नाईट लॅडिंगमुळे रात्रीची सेवा

जळगाव विमानतळावर पूर्वी नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्यामुळे, अनेकवेळा विमान जळगावला न थांबता अहमदाबादला रवाना व्हायचे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या वर्षापासून जळगाव विमानतळावर नाईट लॅंडिंग झाल्यामुळे, विमान कंपनीतर्फे विमानाच्या वेळापत्रकात बदल करून, मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी येणारे विमान सायंकाळी पावणे सात वाजता येणार आहे, तर सायंकाळी जळगावहून सव्वा सात वाजता अहमदाबादला रवाना होणार आहे. दरम्यान, नाईट लॅडिंगच्या सुविधेमुळे मुंबईहून जळगावला यायला विमानाला उशीर झाला तरी हे विमान नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे जळगावला उतरविण्यात येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. यामुळे प्र‌‌वाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.