शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मीस्टाईल घातला वेढा गजबजलेल्या रस्त्यात विद्याथ्र्यावर चाकूहल्ला

By admin | Updated: March 16, 2017 00:05 IST

शाहू कॉम्प्लेक्सजवळ थरार : 8 ते 10 जणांनी घेरुन केली मारहाण

जळगाव :  मित्राला भेटण्यासाठी आलेल्या खगेश दिलीप कोल्हे (वय 19,रा.जुना खेडी रोड, जळगाव) या हॉटेल मॅनजमेंटच्या विद्याथ्र्याला 8 ते 10  जणांनी  बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शाहू महाराज कॉम्प्लेक्सजवळ घेरून चाकूहल्ला करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जखमी जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. भरदिवसा हा थरारक प्रकार घडत असताना खगेशच्या मदतीला जाण्याची हिंमत कोणीही दाखविली नाही. पूर्ववैमनस्यातून खगेश याच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खगेश कोल्हे हा पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने तो जळगावात काही दिवसांपूर्वी घरी आला. धुलिवंदनाच्या दिवशी खगेश हा मित्रांसोबत रथचौकात आला होता. तेथे जैनाबाद येथील आठ ते दहा तरुण खगेश याच्या एका मित्राला शोधत त्या ठिकाणी आले होते. खगेशसोबत असलेल्या मित्राने काय झाले अशी विचारणा केली असता त्या तरुणांनी त्याला काहीही न सांगता मारहाण केली. यानंतर खगेशलाही बेदम मारहाण करून पळ काढला. काही वेळातच खगेशचे मित्र आल्यानंतर त्यांनी जैनाबाद येथे जाऊन त्या मारहाण करणा:यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नव्हते. सायंकाळी गुन्हा दाखलदरम्यान, खगेश कोल्हे या विद्याथ्र्यावर हल्ला झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदविला. त्यात त्याने जुन्या भांडणाचेच कारण सांगितले. त्याच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला सायंकाळी कलम 326, 143, 147 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर फरारदरम्यान, हेडकॉन्स्टेबल भास्कर पाटील, महेंद्र बागुल, अल्ताफ पठाण यांनी जैनाबादमध्ये           जाऊन हल्लेखोरांचा शोध घेतला, मात्र ते फरार झाले. हल्ल्याच्या ठिकाणी हजर असलेला कोल्हे याचा मित्र वैभव पाटील याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते.या टवाळखोरांकडून शाहू नगर परिसरात सतत दहशत माजविली जात असून महिला व मुलींना पाहून या टोळक्याकडून अश्लिल शेरेबाजी केली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.फिल्मीस्टाईल घातला वेढाखगेश बुधवारी रात्री पुण्याला जाणार असल्याने तो सकाळी 11 वाजेच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी शाहू कॉम्प्लेक्सजवळ आला होता. दोघं मित्र गप्पा मारत असताना धुलिवंदनाच्या दिवशी मारहाण करणारे जैनाबाद येथील 8 ते 10 जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी खगेशला दुचाकीवरुन फिल्मीस्टाईल वेढले आणि काहीही न बोलता मारहाण करण्यास सुरुवात केली. साई नामक तरुणाने त्याच्या पोटावर चाकू हल्ला केला. हा प्रकार पाहून मित्राने तेथून पळ काढला. त्या ठिकाणाहून दुचाकीवरुन जात असलेल्या एकाने खगेशला रस्त्यावर जखमी अवस्थेत पाहून त्याने दुचाकीवरुन  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही वेळातच खगेशच्या आई-वडिलांनी तसेच मित्रांनी जिल्हा रुग्णालय गाठले. खगेश याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.