शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

प्रवाशाच्या ४० लाख रोकडच्या बॅगेचा सीसीटीव्ही फुटेजमुळे तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 1:02 AM

जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला.

ठळक मुद्देभुसावळ रेल्वे पोलिसांची कामगिरीरेल्वे पोलिसांनी बॅग दिली आयकर विभागाच्या ताब्यातपोलीस पोहोचले वºहाडाकडे

भुसावळ, जि.जळगाव : जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला. मात्र हरवलेल्या बॅगेत आढळलेल्या ४० लाख रकमेबाबत भुसावळ रेल्वे पोलिसांनी नाशिक आयकर विभागाला कळविले आहे.वाराणसी- मुंबई एक्सप्रेसने १६ मे रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राहुल जगदीश गोस्वामी (वय २१, रा.करमचंद चौक, जबलपूर) हा मुंबई येथे जाण्याकरिता साधारण तिकीट काढून आरक्षित डब्यात बसला होता. डबा क्रमांक एस-४, शिट क्रमांक ३३ वरून प्रवास करताना तोे ३९ लाख ९८ हजार रुपये रोकड असलेली काळ्या रंगाची सॅक बॅग शिटखाली ठेवून झोपला.दरम्यान, राहुलला १७ मे रोजी पहाटे मनमाडजवळ जाग आली. त्याने शिटखाली ठेवलेली बॅग पाहिली, परंतु त्याला ती दिसली नाही म्हणून त्याने त्वरित आजूबाजूच्या प्रवाशांकडे चौकशी केली. प्रवाशांनी सांगितले की, जबलपूर येथून लग्नाचे वºहाडी याच डब्यातून प्रवास करीत होते व ते सर्व भुसावळात उतरले आहे. चुकून ती बॅग लग्न वºहाडी लोकांनी उतरवली असावी, असा अंदाज व्यक्त केला. यावरून राहुल गोस्वामी हा भुसावळ येथे दि.१८ मे रोजी आला व त्याने सर्व हकीकत रेल्वे पोलिसांना सांगितली. त्यावरून भुसावळ रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील १७ मे रोजीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले व त्यावरून वाराणसी एक्सप्रेस गाडीच्या डबा क्रमांक एस ४ मधून लग्नाचे वºहाडी यात काही महिला, पुरुष, मुली असे प्रवासी उतरले होते. त्यांच्यापैकी एका मुलीजवळ राहुल गोस्वामी याने सांगितलेल्या वर्णनाची काळ्या रंगाची सॅक बॅग दिसली. हे सर्व प्रवासी वाहन क्रमांक एमएच ४६ एएक्स ७१९ ने गडकरी नगर भुसावळ येथे गेल्याचे समजले. त्यावरुन रेल्वे पोलीस अधिकारी हे सहकारी पोलिसांसह हॉटेल व्यावसायिक निर्मल सत्यनारायण पिल्ले (वय ३८) रा.खडका रोड, भुसावळ येथे गेले व सदर घटनेची सर्व माहिती दिली. यावेळी पिल्ले यांनी सांगितले की, जबलपूर येथे लग्नाला गेलो होतो. तेथून १६ मे रोजी गाडी क्रमांक १२१६८अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेसच्या डब्यात आरक्षण असल्याने सर्व नातेवाईक मुलांसह १७ मे रोजी भुसावळ येथे उतरलो. तेव्हा सामान जास्त होते म्हणून सर्वांनी मिळून बॅगा घेतल्या व स्थानकाबाहेर आलो व १७ सीटर ट्रॅव्हल्स गाडीने गडकरी नगर येथे घरी आलो. घरात पॉट माळ्यावर ठेवलेल्या बॅगा दाखविल्या. तेव्हा गोस्वामी यांनी सांगितलेल्या वर्णनाची बॅग दिसून आली. ही बॅग पिल्ले यांनी पोलिसात हजर केली.तेव्हा २ पंचासमोर पंचनामा केला. त्यात ३९ लाख ९८ हजार रुपये मिळून आले. ही रक्कम चौकशी करून शहनिशा करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रेल्वे पोलिसात दि.१८ मे रोजी क्रमांक ०३२/१९ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. राहुल जगदीश गोस्वामी यांस चौकशीकरिता २० मे रोजी समन्स बजावण्यात आला होता. सदर कारवाई भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी, एएसआय मधुकर न्हावकर, सुनील पाटील, सुनील इंगळे, आनंदा सरोदे, अजित तडवी, जगदीश ठाकूर, शैलेश ठाकूर, पांडुरंग वसू आदींनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ