शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पोलीस ठाण्याजवळच घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:25 PM

कोल्हे नगरातील घटना : एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या

जळगाव : रामानंद नगर पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कोल्हे नगर (पश्चिम) येथे प्रदीप कडू बाणाईत (३५) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील पत्नीचे ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच दुसऱ्या घटनेत शकील नामदार तडवी यांच्या शाहू नगरातील घरातून १५ हजाराचा ऐवज लांबविल्याच्या घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर व शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रदीप बाणाईत हे एमआयडीसीतील श्रध्दा पॉलिमर्स या कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीला आहेत. रामानंद नगर पोलीस स्टेशनला लागून असलेल्या कोल्हे नगरात ते पत्नी गायत्री व दोन मुलांसह वास्तव्याला आहेत. पत्नी दिवाळीनिमित्त रावेर येथे माहेरी तर प्रदीप हे रायपुर येथे आईकडे वास्तव्यास गेले होते. त्यामुळे घराला कुलुप होते. ३ नोव्हेंबर रोजी प्रदीप घरी आले होते. तेव्हा कुलुप बंद करुन ते परत आईकडे गेले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता पत्नी गायत्री यांना शेजारी राहणाºया राखी चित्ते यांनी फोन करुन घराचे कुलुप तुटल्याची माहिती कळविली. त्यानुसार गायत्री यांनी पती प्रदीप यांना लागलीच घटना कळविली. प्रदीप यांनी घरी येऊन पाहणी केली असता दरवाजाचे कुलुप तुटले होते. कपाटही उघडे होते तर घरातील साहित्य अस्ताव्यस्त होते. कपाटातील दागिने गायब झालेली होती. त्यात १६ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत, १० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले व ८०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा ३६ हजार ८०० रुपयांचा ऐवजाचा समावेश आहे.शाहू नगरात पेंटरकडे १५ हजाराची घरफोडीभावाकडे झोपण्यासाठी गेलेल्या शकील नामदार तडवी (३०) या रंगकाम करणाºया कामगाराच्या घरातून चोरट्याने ११ हजार ५०० रुपये रोख, गॅस सिलिंडर तसेच कपडे असलेली बॅग असा १५ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहू नगरात शकील नामदार तडवी हे पत्नी रसूल व मुले जुया व जुनेद यांच्यासह वास्तव्यास आहेत. २८ आॅक्टोबर रोजी शकील भडगाव तर पत्नी व मुले चोपडा तालुक्यातील पंचक येथे गेले. भडगावहून शकील ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता परतले. घरी गेले व पुन्हा कुलुप लावून गल्लीत राहत असलेला भाऊ जुबेरकडे झोपायला गेले. मंगळवारी सकाळी ८ वाजता घरी परतल्यावर दरवाजाचे कुलुप तुटलेले होते. घरात पाहणी केल्यावर घरातील कोठीत ठेवलेले ११ हजार रुपये रोख तसेच सिलिंडर असा असा ऐवज लांबविल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.दागिन्यांची किमत ५० हजाराच्यावरबाणाईत यांच्या घरातून चोरी झालेले दागिने ३७ हजाराचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे ५० हजारांच्यावर आहे.बाणाईत यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार माहिती दिली. तपास हवालदार विनोद शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव