बंद घरात चोरी, तीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:13+5:302021-09-24T04:21:13+5:30

भागवत सुकलाल चौधरी (रा. पारोळा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार त्यांचे साडू, सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण राघो चौधरी (शेवडी ...

Burglary in a locked house, lampas worth Rs 3 lakh | बंद घरात चोरी, तीन लाखांचा ऐवज लंपास

बंद घरात चोरी, तीन लाखांचा ऐवज लंपास

भागवत सुकलाल चौधरी (रा. पारोळा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार त्यांचे साडू, सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण राघो चौधरी (शेवडी गल्ली, ता. पारोळा) हे २ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घरी आले असता घरातील मुख्य प्रवेशद्वार उघडून आत बघितले असता घरातील लोखंडी कपाट व सामान अस्ताव्यस्त होते.

घराच्या छताला असलेल्या डकची लोखंडी जाळी कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटातील दीड लाख रुपये रोख व पाच तोळे सोने असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत आज पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Burglary in a locked house, lampas worth Rs 3 lakh