जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; जळगाव शासकीय रुग्णालय व महाविद्यालात तणावाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 00:06 IST2026-01-15T00:05:32+5:302026-01-15T00:06:09+5:30
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याची प्राथमिक माहिती

जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; जळगाव शासकीय रुग्णालय व महाविद्यालात तणावाचे वातावरण
जळगाव तालुक्यातील भोलाणे शिवारात बाळकृष्ण सदाशिव कोळी यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर अवस्थेत त्यांना रात्री जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कोयत्याने वार केल्यामुळेच हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.