बारावीत नापास विद्यार्थिनीची आत्महत्या तर युवकाने मंदिरातील ध्वजाने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 05:31 PM2019-06-07T17:31:20+5:302019-06-07T17:31:45+5:30

उज्ज्वलाचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता.

The boy was taken to the house by the flag of the school after the boycott | बारावीत नापास विद्यार्थिनीची आत्महत्या तर युवकाने मंदिरातील ध्वजाने घेतला गळफास

बारावीत नापास विद्यार्थिनीची आत्महत्या तर युवकाने मंदिरातील ध्वजाने घेतला गळफास

Next

जळगाव : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून उज्ज्वला भगवान अस्वार (21) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील शिरसोली, येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तर दुसऱ्या घटनेत एका मुजर युवकाने मंदिरातील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

उज्ज्वला हिचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता. सकाळी तो घरी आला असता बहिणीने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. स्वप्नीलने लागलीच आई, वडीलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर, उज्ज्वला हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उज्ज्वलाच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. मात्र, परिक्षेत अपयश आल्याने उज्ज्वलाने हे टोकाचे पाऊल उचललल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. मात्र, उज्ज्वलाच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात आहे.

जळगाव तालुक्यातील वाकडी येथील आनंदा बाजीराव गायकवाड (३२) या तरुणाने गावातील मंदिरातच तेथील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आनंदा गायकवाड हा तरुण मिळेत ते मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गुरुवारी तो कामावरुन घरी न जाता गावातील मंदिरातच गेला व तेथेच झोपला. सकाळी लोकांनी मंदिराच्या भगवा ध्वजाच्या सहाय्यानेच त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्याला खासगी डॉक्टरांकडे नेले,मात्र डॉक्टरांना त्यास मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गायकवाड याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The boy was taken to the house by the flag of the school after the boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.