पाणंद फाउंडेशनच्या शिबिरात १०६ माजी विद्यार्थ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:44+5:302021-02-05T05:55:44+5:30

पाणंद फाउंडेशन ही नूतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची संस्था आहे. सामाजिक जाणिवेतून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पाणंद फाउंडेशनतर्फे वेळोवेळी ...

Blood donation of 106 alumni in Panand Foundation camp | पाणंद फाउंडेशनच्या शिबिरात १०६ माजी विद्यार्थ्यांचे रक्तदान

पाणंद फाउंडेशनच्या शिबिरात १०६ माजी विद्यार्थ्यांचे रक्तदान

पाणंद फाउंडेशन ही नूतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची संस्था आहे. सामाजिक जाणिवेतून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पाणंद फाउंडेशनतर्फे वेळोवेळी करण्यात येते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व नूतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपायुक्त प्रशांत पाटील, मंत्रालयातील अधिकारी मनीष पाटील, आर.पी.एफ. पोलीस निरीक्षक सी. एस. पटेल हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थापक दिलीप बारी, प्रा. सतीश पडलावार, पाणंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तडवी, शशिकांत फेगडे, ज्ञानेश्वर साळुंखे, अमित मगन पाटील, संतोष उबाळे, गजानन शिंदे, पद्माकर खैरनार, हर्षल पाटील, पंकज नहाले, व पाणंद फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 106 alumni in Panand Foundation camp