शहरं
Join us  
Trending Stories
1
रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन
2
"कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच"
3
"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला
4
"नंबर दोनचे धंदे..., माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर; खैरेंचं डिपॉझिट वाचलं तरी बरं होईल", भुमरेंचा पलटवार
5
अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
6
"मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार", ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा
7
भारतीय नौदलात नोकरीची संधी, ३०० हून अधिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज
8
PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान
9
'नाशिकला भरपूर उमेदवार, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे', छगन भुजबळ यांचा टोला  
10
शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा हटवण्यासह दिली ही आश्वासने
11
तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन
12
"५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…", मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला 
13
भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: गॅस सिलेंडर ५०० रुपयांत, केंद्रात ३० लाख सरकारी नोकऱ्या; शरद पवारांचा जाहीरनामा
15
"मी दत्तक मुलगी नाही", श्रिया पिळगांवकरने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, 'बर्थ सर्टिफिकेट...'
16
Tristan Stubbs Fielding Video Viral: आ रा रा रा खतरनाक.... चेंडू वेगाने जात असताना ट्रिस्टन स्टब्सने हवेत घेतली उडी अन् मग...
17
भाजपा उमेदवाराला पत्नीने दिले आव्हान, अपक्ष निवडणूक लढवणार, या मतदारसंघात पती विरुद्ध पत्नी लढत रंगणार 
18
या मतदारसंघात काँग्रेसवर आलीय स्वत:च्याच अधिकृत उमेदावाराविरोधात प्रचार करण्याची वेळ, कारण काय? 
19
"तुम्हाला शॉर्टकट मिळतो पण...", रिअ‍ॅलिटी शोबाबत स्पष्टच बोलला अवधूत गुप्ते
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Kotak Bank आपटला, हिदाल्कोमध्ये तेजी 

'एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 3:39 PM

गुलाबराव पाटील हे रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते.

जळगाव:  भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सध्या कोणाच्या संपर्कात आहेत, या बद्दल मला माहिती नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात केले. 

गुलाबराव पाटील हे रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते. एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर  गुलाबराव पाटील यांनी वरील विधान करीत खडसे यांच्या पक्षांतराचे संकेत दिली. तसेच त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.   शिवसेनेत तर जाणार नाहीत खडसे ?

मुंबईत खडसे यांची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार यांच्या सोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत चार दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात  भेट झाली नाही. मध्यंतरी खडसे यांनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून होत होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते.

त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाचे संकेत आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे.

खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबईत असताना एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भेटीगाठी न होणे, त्यानंतर खडसे मुंबईतून जळगावात परतल्यानंतर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी 'खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे', असे वक्तव्य करणे यामुळे आता खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत आहे. या साऱ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार