शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद मुलांसाठी भोईटे शाळा मिळावी म्हणून भाजपाचा सभात्याग

By admin | Updated: June 20, 2017 16:29 IST

महासभेपूर्वी भाजपा नगरसेवक, पालक व विद्याथ्र्याचा महापौरांना घेराव. पर्यायी जागेचे आश्वासन दिल्यावरही भाजपाचा चर्चेचा अट्टाहास. परवानगी नाकारल्याने नाराजी. प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन.

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.20- उत्कर्ष मतिमंद विद्यालयाला मनपाच्या भोईटे शाळेची इमारत मिळावी, या मागणीसाठी मतिमंद विद्याथ्र्यासह पालक तसेच भाजपा नगरसेवक रवींद्र पाटील यांनी मंगळवारी महासभेपूर्वीच मनपात येऊन प्रवेशद्वारावर महापौरांना घेराव घातला. महापौरांनी गावातच पर्यायी जागेचे आश्वासन दिल्यावरही महासभा सुरू होताच भाजपा सदस्यांनी या विषयावर चर्चेचा आग्रह धरला. मात्र परवानगी नाकारल्याने नाराज भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.
 दरम्यान, काही पालकांनी सभागृहात घुसण्याचा प्रय} केला. त्यांना बाहेर काढल्याने सभागृहाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी लाथा मारल्या. अखेर भाजपा नगरसेवकांसह या नागरिक व पालकांनी मनपा सतरा मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेर पाय:यांवर ठिय्या आंदोलन केले. 
काय आहे मागणी
इन्स्टिटय़ूट फॉर रूरल डेव्हलपमेंड अॅण्ड सोशल सव्र्हिसेस जळगाव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय ही  शाळा शहर व आजूबाजूच्या परिसरातील मतिमंद मुलांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी 1989 पासून  खोटेनगर परिसरात जीवराम नगरात सुरू आहे. त्यात शहरातील विविध भागातून 99 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी केवळ 40 विद्याथ्र्यानाच शासनाकडून अनुदान तत्वावर मान्यता मिळालेली आहे. उर्वरीत 59 विद्याथ्र्याना अनुदान नसल्याने संस्थेला आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यातच शाळा शहराच्या एका टोकाला असल्याने मुलांना स्कूल बसने ने-आण करावे लागते. मात्र संस्थेकडे एकच स्कूलबस असल्याने दोन फे:या माराव्या लागतात. विद्याथ्र्याना बसमधून लांबवर नेणे अवघड होत असल्याने शहरात मध्यवर्ती भागात जागा मिळावी, अशी मागणी संस्थेकडून होत आहे. ठिय्या आंदोलनात संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश अग्रवाल व नगरसेवक रवींद्र पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले.