कजगाव कनाशी रस्ता कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST2021-09-26T04:19:07+5:302021-09-26T04:19:07+5:30

कजगाव, ता. भडगाव : कजगाव कनाशी रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विशाल पाटील, अनिल महाजन यांच्या उपस्थितीत ...

Bhumipujan of Kajgaon Kanashi road work | कजगाव कनाशी रस्ता कामाचे भूमिपूजन

कजगाव कनाशी रस्ता कामाचे भूमिपूजन

कजगाव, ता. भडगाव : कजगाव कनाशी रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विशाल पाटील, अनिल महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

श्री क्षेत्र कनाशी कजगाव हा रस्ता खराब झाल्याने या चार किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे डॉ. विशाल पाटील, कजगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व जय पाचपावली माता मित्र मंडळाचे सर्वेसर्वा अनिल महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य युवराज पाटील यांच्या हस्ते दि. २४ रोजी कजगाव रेल्वे गेटजवळ करण्यात आले.

महत्त्वपूर्ण असलेला हा मार्ग उखडून पडला होता. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने २७३ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन झाले. हा मार्ग मंजूर झाल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

प्रसिद्ध अशा श्रीक्षेत्र कनाशी येथे जाणाऱ्या असंख्य भाविकांची रस्त्याबाबतची मोठी अडचण दूर होणार आहे. भूमिपूजनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राऊत, यांच्यासह जाधव, सावंत, कजगावचे ग्रामपंचायत सदस्य अनिल टेलर, उत्तम मोरे उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of Kajgaon Kanashi road work