शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

बेगम परवीन सुलताना यांना जीवन गौरव पुरस्कार

By admin | Updated: March 16, 2017 18:14 IST

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार- 2016 हा ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 16 - राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार- 2016 हा ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उद्या, शुक्रवार दि. 17 मार्च रोजी जळगाव येथे एका शानदार समारंभात परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात येणार आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी गान सरस्वती किशोरी आमोणकर, संगीत मार्तंड पंडित जसराज, गान तपस्विनी प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक पंडित रामनारायण आदी ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या शुक्रवार, 17 मार्च रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा बाल गंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव येथे सायंकाळी 6.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 19 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या शास्त्रीय संगीत महोत्सवात 17 मार्च रोजी गायिका प्रीती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर, सतारवादक समीप कुलकर्णी आपली कला सादर करतील. तर 18 मार्च रोजी गायक देबबर्णा कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोद वादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना यांच्या सुरेल गायकीचा आनंदही रसिकांना घेता येईल. 19 मार्च रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरी वादक विवेक सोनार आपली कला सादर करतील. या महोत्सवाचे आयोजन स्व. वसंत चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगांव या शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेचा सहकार्याने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.