पिंप्राळ्यात कुलरच्या शॉकने बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 13, 2017 11:08 IST2017-06-13T11:08:50+5:302017-06-13T11:08:50+5:30

मित्राच्या घरात खेळत असताना कुलरचा शॉक लागून रोहीत सतीश पाटील (वय 10 रा.हलवाई गल्ली, पिंप्राळा, जळगाव) या मुलाचा मृत्यू झाला

The baby's death by the cooler shock in the pimpera | पिंप्राळ्यात कुलरच्या शॉकने बालकाचा मृत्यू

पिंप्राळ्यात कुलरच्या शॉकने बालकाचा मृत्यू

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 : शेजारी राहणा:या मित्राच्या घरात खेळत असताना कुलरचा शॉक लागून रोहीत सतीश पाटील (वय 10 रा.हलवाई गल्ली, पिंप्राळा, जळगाव) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली.
 रोहीत हा शेजारी राहणारे बाळू प्रल्हाद मेटकर यांच्या घरात खेळत होता. त्यावेळी कुलरला त्याचा स्पर्श झाला. कुलरमध्ये वीज प्रवाह असल्याने त्याला तो चिटकला तेथून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. 

Web Title: The baby's death by the cooler shock in the pimpera