‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत न्हावी येथे जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 17:34 IST2019-09-22T17:34:25+5:302019-09-22T17:34:47+5:30
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत न्हावी येथे जनजागृती रॅली काढण्यात आली.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत न्हावी येथे जनजागृती रॅली
न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत न्हावी येथे जनजागृती रॅली काढण्यात आली.
११ सप्टेबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. संपूर्ण कालावधीत प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यात आली. गाव व परिसर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे. गावात रस्त्यालगत व परिसरात आढळणारा प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात संकलित करून त्याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावणे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने हातगाडीवरील छोटे विक्रेते यांना नवीन प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर प्रतिबंध करणे तसेच गावातील सर्व शाळा अंगणवाडी व इतर परिसर स्वच्छ ठेवणे, जैविक कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे यावर रॅलीत जनजागृती करण्यात आली.
गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, सरपंच भारती नितीन चौधरी, ग्रा.पं सदस्य, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, परिचारिका, सफाई कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी ए.आर.देसले यांनी प्लॅस्टिक बंदी मोहीम राबविणे, गावातील सर्व व्यावसायिकांना तसेच ग्रामस्थांना जनजागृती रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले