शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सत्ताधाऱ्यांच्या गट-तटाच्या हालचालींकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:18 IST

मनपा महासभा : वॉटरग्रेस, भोजन ठेक्यासह उपमहापौर बदल हालचालींचे पडसाद उमटणार?

जळगाव : कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा ठेका असो की वॉटरग्रेस वॉटरग्रेसला पुन्हा ठेका दिल्यावरून भाजपतील मतभेद सध्या चर्चेचा विषय आहे. महासभेच्या निमित्ताने या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यावर महासभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच उपमहापौर, गटनेते बदलाच्या हालचालीचेही पडसाद यात उमटतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तसे झाले तर शिवसेना भाजपामधील अंतर्गंत गटबाजीचा फायदा घेऊन आक्रमक पद्धतीने सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला कोंडित पकडण्याची शक्यता आहे.

जेवणे चांगले-वाईटचा मुद्दाशहरात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने निकृष्ठ जेवण आणि कोविड सेंटरमधील अस्वच्छता बाबत रुग्णांकडून तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा व इतर नगरसेवकांनी शासकीय अभियांत्रिकीमधील कोविड सेंटरची पाहणी करून जेवणाचा दर्जा व स्वच्छतेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे मात्र महापौर भारती सोनवणे यांच्याकडून जेवणाचा दर्जा व तेथील सोयी सुविधा उत्तम सांगण्यात येत आहे.यामुळे भाजपमधील अंतर्गंत नाराजी उघडपणे दिसून आली. विशेष म्हणजे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी त्यांच्याच पक्षाच्या महापौरांकडे तक्रार न करता, आयुक्तांना पत्र देऊन जेवणाचा ठेका बंद करण्याची मागणी केलीे. या पत्राची दखल घेऊन प्रशासनाने भोजनासाठी निविदा काढून, प्रस्तावदेखील मागविले आहेत.वॉटरग्रेसवरून आमने-सामनेवॉटरग्रेसचा ठेका पुन्हा सहा महिन्यांनी वॉटरग्रेसला देण्यात आल्याने भाजपमधील दोन गट पुन्हा छुप्या पद्धतीने एकमेकांवर आरोप करित आहेत.नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तर या ठेक्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रशासनाने कायदेशीर बाबी दाखवून, स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वॉटरग्रेसच्या मुद्यावरून सत्ताधाºयांमध्येच अंतर्गंत हा कलह महासभेच्या निमित्ताने बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच सत्ताधारी नगरसेवकांच्याच प्रभागात संथ गतीने विकास कामे सुरू असल्याने, या नाराजीचेदेखील पडसाद या महासभेत उमटण्याची शक्यात वर्तविली जात आहे.शिवसेना संधीचे सोने साधत आक्रमक होण्याची शक्यतासत्ताधाºयांमधील कोविड आणि वॉटरग्रेसच्या मुद्द्यावरून अंतर्गत गटबाजी पाहता याचा फायदा घेऊन शिवसेना सत्ताधाºयांना कोंडिच पकडण्याची शक्यता आहे. तसेच कोविडसह, शहरातील अनियमित स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, निविदांमधील घोळ आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या दुषीत पाण्यावरून प्रशासनाला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाच महिन्यातून होणारी आजची महासभा विविध मुद्यांवरून गाजण्याची शक्यता असून, भाजपला विरोधी पक्षाकडून होणाºया आरोपांना उत्तर देण्यासाठी मोठ्या कसोटीला उतरावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.कोरोनामुळे खांदेपालटचा निर्णय लांबणीवरसत्ताधारी भाजपतर्फे महापालिकेत दरवर्षी महापौर व उपमहापौर पदासाठी ज्येष्ठाना संधी देण्यात येणार आहे. यंदा विद्यामान उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षातर्फे उमेदवाराचा शोध सुरू होता. यामध्ये सुनील खडके यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, शासनाने कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व निवडणूक प्रक्रियेला बंदी घातल्यामुळे, मनपातील खांदेपालटचा निर्णय लांबणीवर पडला आहे. तसेच गटनेते भगत बालाणी यांच्याकडील गटनेते पदाची जबाबदारी काढून जितेंद्र मराठे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव