शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासाठी जळगावला भरारी पथकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 7:18 PM

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा भाग म्हणून खासगी रुग्णालयांवर दर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ...

जळगाव: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा भाग म्हणून खासगी रुग्णालयांवर दर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरीता भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.कोविड 19 बाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आकारवयाच्या कमाल दर मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेली आहे. खासगी वाहने, रुग्णवाहिका अधिग्रहीत करुन शासन स्तरावर त्यांचे कमाल दर निश्चित केलेले आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करुन देण्याबात सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या कोविड -19 बाधित रुग्णांकडून विहीत दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याबाबत शासन स्तरावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मा. उच्च न्यायालयात देखील जनहित याचिका याचिकाकर्त्याकडून दाखल झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्राकरीता पुढीलप्रमाणे भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ते असे : पथकप्रमुख- उपविभागीय अधिकारी, सदस्य- निवासी नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, उपकोशागार अधिकारी, अव्वल कारकून (कोशागार), संबंधित तलाठी. वरील प्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने शासन निर्णयात नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.अधिसूचित दर दर्शनी भागावर रुग्णांना व नातेवाईकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. या पथकाने खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणीकरण्यासाठी या कार्यालयाच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आलेल्या लेखापरिक्षण पथकाच्या सहकार्याने आकारले जाणारे दर खाजगी रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर विहीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी.महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयांनी दाखल होणा-या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे आपेक्षित आहे याबाबतची तपासणी करावी. सदर पथकाने त्यांचे कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व खाजगी रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करावी, व या बाबतचा तपासणी अहवाल कार्यालयास सादर करावा, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्त यांनी यापूर्वीच अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव