शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चार मार्केटच्या जागेच्या नोटीसवर मनपा न्यायालयात दाद मागणार

By admin | Updated: March 20, 2017 00:30 IST

स्थायी समितीच्या सभेत निर्णय : अशासकीय प्रस्ताव अजेंड्यावर

जळगाव : महात्मा फुले मार्केटसह चार मार्केटची जागा शर्तभंग झाल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेण्याच्या मिळालेल्या नोटीसविरोधात मनपा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठीचा अशासकीय प्रस्ताव सोमवार, २० रोजी दुपारी १२ वाजता मनपात आयोजित स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणार आहे. शासनाचे महसूल विभागाचे उपसचिव डॉ.संतोष भोगले यांनी २२ फेब्रुवारी २०१७ रोजीच जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून जळगाव शहर सिटी सव्हे नंबर १९३८/३७/ब-१ ही व्यापारी संकुले असलेली मुळची शासकीय जागा मालकी हक्काने मिळण्याबाबत महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांच्या सहकारी फेडरेशनच्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे अहवाल शासनास प्राप्त झाले. त्या अनुषंगाने या व्यापारी संकुलाची जमीन ही ‘ब’ सत्ता प्रकाराची असून दैनिक बाजार व आठवडे बाजार या प्रयोजनार्थ निरंतर वापरासाठी शासनाने प्रदान केलेली आहे. मात्र याप्रकरणी तत्कालीन नगरपालिकेने या जमिनीच्या वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अथवा शासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असताना अशी कुठलीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने याप्रकरणी शर्तभंग झालेला दिसून येत आहे. ही जमीन शर्तभंगाच्या कारणास्तव सरकारजमा का करण्यात येऊ नये? याबाबत मनपास कारणे दाखवा नोटीस देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे व त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे या पत्रात सूचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी मनपाला नोटीस बजावून ७ दिवसांत खुलासा मागविला होता. मात्र मनपा प्रशासनाने १ महिन्याची मुदत मागितली आहे. दरम्यान या नोटीसच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात मनपाची बाजू मांडण्याबाबतचा नितीन बरडे यांनी दिलेला अशासकीय प्रस्ताव सोमवार, २० रोजीच्या स्थायी समिती सभेसमोर मांडण्यात येणार आहे. त्यात चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.