अंतुर्लीत मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST2021-07-01T04:12:36+5:302021-07-01T04:12:36+5:30

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : येथील इंदिरा नगरमधील १६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना ३० रोजी पहाटे ...

Anturlit girl dies of snake bite | अंतुर्लीत मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

अंतुर्लीत मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : येथील इंदिरा नगरमधील १६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना ३० रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातच घडली.

रोशनी बी रशीद शेख (सुतार) (१६) ही आजोबांकडे राहात होती. रात्री ती झोपलेली होती. पहाटे काही तरी चावल्याने ती जागी झाली. तिने उठून पाहिले असता विषारी नाग अंथरुणातून जात असताना दिसल्याने ती घाबरुन ओरडली. घरातील आजोबा जागे झाले. या मुलीला घेऊन तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात स्नेक बाईटची लस नसल्याने त्यांनी मुक्ताईनगर येथील जिल्हा उपरुग्णालयात नेले. तेथे तरुणीला मृत घोषित केले. या मुलीचे आईवडील देवळगुजरी, ता. जळगाव जामोद येथे राहतात. ती दोन वर्षांची असल्यापासून आजोबा उस्मान खशे बफात यांच्याकडे राहात होती.

फोटो नंबर ०१ आरएमएम ०४

Web Title: Anturlit girl dies of snake bite