शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आणि...वाहनांचा कर्णकर्कश आवाजऐवजी येत होता पक्ष्यांचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:15 IST

विना वाहन दिवस साजरा : एसएसबीटी महाविद्यालयातील उपक्रम

जळगाव- महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, एसएसबीटी महाविद्यालयात महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसाचे.बांभोरी परिसरातील एसएसबीटी महाविद्यालयात दररोज सुमारे ५०० च्यावर वाहने ये-जा करित असतात व उभया असतात. मात्र, महाविद्यालयातील नेचर फ्रेंड क्लबच्या माध्यमातून मंगळवारी विना वाहन दिवस साजरा करण्यात आला. सोबतच दर महिन्याला एक दिवस विना वाहन दिवस पाळण्यात येईल, असा संकल्प यावेळी करण्यात आला. क्लबच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात कार आणि दुचाकी वाहन धारकांना ‘नो व्हेईकल डे’ विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जनजागृती मोहिमेला वाहनधारकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला.१७३ वाहने महाविद्यालयात आली...!काही प्रमाणात का होईना..पण प्रदुषणाचे प्रमाण कमी होईल, सोबतच महामार्गावर होणारी ट्रॅफिक सुध्दा कमी होईल. हा उद्देश समोर ठेवून नेचर क्लबच्या माध्यमातून मंगळवारी विना वाहन दिवस साजरा करण्यात आला. सोमवारी महाविद्यालयात ४७९ वाहने उभी होती. मंगळवारी मात्र, तब्बल ६६ टक्के महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभियानात सहभागी होऊन खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करून महाविद्यालय गाठले. त्यामुळे फक्त १७३ जण वाहनांनी महाविद्यालयात आले होते़ तर ३०६ जणांनी सार्वजनिक वाहनांचा वापर केला.परिसर शांत व रम्य..!महाविद्यालयाच्या नेचर क्लबच्या माध्यमातून राबविलेले विना वाहन दिवसामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास हातभार लावून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली. महाविद्यालय परिसरात वाहनांची संख्या असल्यामुळे परिसर शांत, रम्य, प्रसन्न आणि हिरवाईने नटलेला वाटत होता. त्यामुळे वाहनांच्या आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता़ या प्रकराचा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबविण्यात यावा, असे आवाहनही केले आहे़ दरम्यान, या मोहिमेत पहिल्याच टप्प्यात ६६ टक्के वाहनधारक सहभागी झालेत म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य प्रा.डॉ. एस. पी. शेखावत, नेचर क्लबचे कॉर्डिनेटर प्रा.डॉ. एम. हुसेन, प्रा. गौरव खोडपे यांनी समाधान व्यक्त केले. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विराज भामरे, कल्पेश पाटील, अनुप पाटील, पराग सुतारे, संकेत सोनवणे, शुभम शुक्ला, तुषार पाटील, मनीष महाजन, विपुल बिºहाडे व नेचर क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव