आमोदे येथे शालकाची मेहुण्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:30 IST2017-03-16T00:30:35+5:302017-03-16T00:30:35+5:30

बहिणीला नांदवण्याचे कारण : पाच जणांविरुद्ध गुन्हा

Amodude Shalaka's Mehunala assault | आमोदे येथे शालकाची मेहुण्याला मारहाण

आमोदे येथे शालकाची मेहुण्याला मारहाण

शिरपूर : तालुक्यातील आमोदे येथे शालकाने त्याच्या मेहुण्याला चाकूचा धाक दाखवून 20 हजार रुपयांच्या रोकडसह गळ्यातील 2 तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना बहिणीला नांदविण्याचा निर्णय न झाल्याने घडली आहे.  शालकाने चक्क त्याच्या मेहुण्यावर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले आहे.
15 रोजी दुपारी 12़30 वाजेच्या सुमारास ही घटना आमोदे गावात घडली़ रमेश भोजूसिंग राजपूत (रा़आमोदे, ता. शिरपूर)  हे घराच्या ओटय़ावर उभे होते. त्याचवेळी  त्यांचा शालक दीपक सुभाषसिंग गिरासे (रा़दोंडाईचा, ता. शिंदखेडा) व इतर 5 जण तेथे आले.  त्यांनी दीपक यांचा मेहुणा रमेश राजपूत यांना बहिणीला नांदविण्याचा निर्णय लावून टाका, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रमेश राजपूत यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची 2 तोळे वजनाची सोनसाखळी व मागील खिशातील 20 हजार रुपये रोख असे एकूण 80 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला़
 या हाणामारीत रमेश राजपूत यांच्या डोक्याजवळ व कानाला चाकू लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत.  त्यांना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े त्यांनी दिलेल्या जबाबावरून शिरपूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दीपक गिरासेसह इतर 5 जणांविरोधात भादंवि कलम 395, 324, 141, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे दरोडय़ाचा गुन्हा नोंदविण्यात आला आह़े
भर दुपारी आमोदे गावात ही घटना घडल्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. रमेश राजपूत यांना मारहाण करून आरोपी गेल्यानंतर रमेश यांच्या निवासस्थानाकडे ग्रामस्थांची गर्दी झाली.

Web Title: Amodude Shalaka's Mehunala assault