शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातून कडधान्याबरोबरच मुलांना मिळतेय डाळ, तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : जळगाव तालुक्यातील पहिली ते आठवीच्या ६२ हजार ४०७ लाभार्थी विद्यार्थ्यांना कडधान्याबरोबरच डाळ व तांदळाचेही वाटप केले जात ...

जळगाव : जळगाव तालुक्यातील पहिली ते आठवीच्या ६२ हजार ४०७ लाभार्थी विद्यार्थ्यांना कडधान्याबरोबरच डाळ व तांदळाचेही वाटप केले जात असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहाराचा लाभ मिळाला नाही, त्यांना घरपोच धान्य वाटप शिक्षकांकडून करण्यात आले असल्याचेही गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी दिली.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशातून शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. दरम्यान, २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्य, डाळ व तांदळाचे वाटप करण्यात आले़ त्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून घेतले जात होते. आताही जळगाव तालुक्यातील ६२ हजार ४०७ विद्यार्थ्यांना मटकी, तूरडाळ, तसेच तांदळाचा लाभ दिला जात आहे.

घरपोच आहार

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतच आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. दरम्यान, कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून पोषण आहारांतर्गत तांदूळ, डाळ वाटप केले गेले़ ज्या विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ तसेच कडधान्याचा लाभ मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना घरपोच वाटप करण्यात आले आहे.

सध्या मटकी, तूरडाळ व तांदूळ वाटप केले जात आहे़ शासनाच्या सूचनेनंतर प्रत्यक्ष पोषण आहार शिजवायला सुरुवात होईल़ तेव्हा मेन्यूमधील संपूर्ण आहाराचा पुरवठा होईल़ तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळत असून अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही़

- सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग

- जळगाव तालुक्यातील एकूण लाभार्थी

६२ हजार ४०७

- पहिली ते पाचवीचे लाभार्थी

३८ हजार ३०८

- सहावी ते आठवीचे लाभार्थी

२४ हजार ९९