शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा, पोलीस चौकीला लागूनच असलेले बंद घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST

जळगाव : इच्छादेवी पोलीस चौकीला लागूनच असलेल्या पंचशील नगरात आसिफ खान सुभान खान (४३) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ...

जळगाव : इच्छादेवी पोलीस चौकीला लागूनच असलेल्या पंचशील नगरात आसिफ खान सुभान खान (४३) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपये रोख व सव्वालाखाचे दागिने असा दोन लाखांच्यावर ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

अतिशय दाटीवाटी व वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी झाली आहे. आसिफ खान यांचे किराणा दुकान असून एकाच घरात दुकान व वास्तव्य आहे. पाचोरा येथे मामाच्या मुलाचे लग्न असल्याने पत्नी व तीन मुलांसह शनिवारी रात्री घर व दुकानाला कुलूप लावून पाचोरा येथे गेले होते. गावाला जाताना त्यांनी शेजारच्यांना घराकडे लक्ष ठेवा म्हणून सांगितले होते. रविवारी सकाळी आठ वाजताच शेजारी राहणाऱ्या सलमान नावाच्या तरुणाने फोन करून दुकान व घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. त्यामुळे आसिफ खान यांनी तातडीने घर गाठले असता दोन्ही कुलूप तोडलेले होते तर कपाटही तुटलेले होते. त्यातील दागिने व किराणा दुकानातील गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख असा ऐवज गायब झालेला होता.

दुकानातही चोरट्यांनी नासधून केल्याचे दिसून आले. याबाबत एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरी झालेल्या वस्तू व रोकड याची माहिती खान यांनी पोलिसांकडे सादर केली.

शेजारीच पोलीस चौकी

ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावर इच्छादेवी पोलीस चौकी आहे. ही चौकी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्याच अंतर्गत येते. या चौकीवर उपनिरीक्षकाची ड्युटी लावण्यात आलेली आहे, मात्र कधीही तेथे उपनिरीक्षक नसतात, त्याशिवाय रात्रीच्यावेळी कर्मचारीही नसतात. चहा विक्रेत्याकडे येणारे ग्राहकच येथे तासन‌्तास थांबून असल्याची माहिती या ठिकाणाहून देण्यात आली.