पारोळ्यानंतर आता चोपड्यातही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:49+5:302020-12-03T04:28:49+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर बुधवारी जनता संचारबंदी चोपडा (जि. जळगाव) : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता नागरिक व व्यापारीच पुढे ...

After Parola, now also in Chopda | पारोळ्यानंतर आता चोपड्यातही

पारोळ्यानंतर आता चोपड्यातही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर बुधवारी जनता संचारबंदी

चोपडा (जि. जळगाव) : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता नागरिक व व्यापारीच पुढे आले आहेत. चोपडा येथे आजपासून प्रत्येक बुधवारी जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे. पारोळा शहरानंतर जनता संचारबंदी लागू करणारे चोपडा हे दुसरे शहर असेल.

व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरात लहान-मोठे एकही दुकान सुरू राहणार नाही, असा ठराव या बैठकीत करण्यात आला.

Web Title: After Parola, now also in Chopda