शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
2
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहे अब्दुल्लाहिल अमान आजमी?
3
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
4
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
5
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
6
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
7
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
8
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
9
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
10
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
11
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
12
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
13
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
14
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
15
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
16
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
17
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
18
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
19
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे तलावात पाच वर्षांनंतर साचले पाणी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 16:34 IST

गेल्या सहा वर्षांपासून कोरडा पडलेल्या हरताळे तलावात यंदा पाणी साठायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देहरताळेकर सुखावले२० ते २५ टक्के जलसाठा नागरिकांना तूर्त दिलासाशेवटी वरूणराज्याचीच कृपा

चंद्रमणी इंगळेहरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून कोरडा पडलेल्या हरताळे तलावात यंदा पाणी साठायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे यंदाही तलाव भरेल किंवा नाही याची चिंता वाटत होती. परंतु निसर्गाची किमयाच न्यारी. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीचा प्रत्यय येथे सर्वांनाच आला. आॅगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे हरताळे तलावाची तहान भागवायला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षात कधी नव्हे एवढी हरताळेवासीयांना व सर्व पशुपक्ष्यांसह प्राण्यांना पाणीटंचाईचा मोठ सामना करावा लागला आहे.कमी पावसामुळे हा तलाव भरतच नव्हता. त्याचे वरील स्रोत भरल्याने यंदा निसर्गाची सर्वांवरच कृपा झाली आहे. आॅगस्टपर्यंत पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. परिसरातील सर्वच पाझर तलाव कोरडेठाक होते. मात्र १५ आॅगस्ट व सप्टेंबरच्या पावसामुळे लहान तलाव जलसाठा पूर्ण झाल्याने हरताळे तलावाचे पाणी साठायला मदत झाली आहे.एकेकाळी शेतीसाठी वरदान असलेला १७५ हेक्टर २५ आर. क्षेत्रावरील तलाव आता निसर्गाच्या पाण्यानेच भरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हरताळेकरही सुखावले आहे. तसेच विहिरींच्या पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा पावसाळा समाधानकारक असला तरी केळी, ऊस, फळबाग आदी व्यापारी पिकांपासून शेतकरी कोसोदूर आहे. आता जरी विहिरीला पाणी असले तरी केळी लागवड हातची गेल्याने केळी लागवडीवर परिणाम झालेला दिसत आहे.पुरातन तलावाचे संगोपन व जतन होणे गरजेचे असताना या तलावाकडे जि.प.ने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे आरोप नागरिकांत बोलले जात आहे. सध्या तलाव हळू हळू शेवटच्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असली तरी तलावातील काटेरी झुडपांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. काही भागात तर काटेरी झुडपे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे विद्रुपीकरण कायम आहे.सरत्या पावसाळी ऋतूतील निसर्गाच्या कृपेने हरताळे तलावाची व पर्यायाने संपूर्ण परिसरातील लहान तलावाची तहान तूर्तास भागवली आहे.गेल्या पाच-सहा वर्षापासून तलाव काही अंशी का होईना पाण्याने भरला भरत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.२०१३ मध्ये हा तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्यानंतर सलग दर वर्षी कमी पावसामुळे तलाव भरत नव्हता. आता पाच वर्षांनंतर जलसाठा दिसत असल्याने डोळ्यांचे पारणे फिटले आहे.तलाव कोरडा पडल्याच्या काळात हजारो डंपर, ट्रॅक्टरने हा गाळ शेतीसाठी व धरणासाठी उपयुक्त ठरला.तलावाच्या दक्षिणेकडील भागातील गाळ काढल्याने जलसाठा होण्यास मदत झाली आहे.तलावात हळूहळू जलसाठ्यात वाढ होत असल्याने मासेमारीला सुगीचे दिवस येण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यासाठी मत्स्यबीज सोडणे गरजेचे आहे.तलावात जलसाठा होत असल्याने या परिसरात शेकडो प्रकारच्या पक्ष्यांचा विहार सुरू झाला आहे. विविध जातींचे पक्षी निसर्गप्रेमी व पक्षीमित्रांना पाण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने प्राण्यांचे विहरणे या वेळेत अनुभवता येणार आहे. पाणीसाठा होत असल्याने पर्यटकांना व पक्षीप्रेमींना निसर्गरम्य ठिकाणाचा मनमोहक आनंद आता घेता येणार आहे. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.असे असले तरी ओझरखेडा तलावाचा ओव्हर फ्लो व आबदगाव तलावाचा पूर्णा नदीवरील पाईपलाईनने जाणारा पाण्याचा स्रोत या तलावात सोडण्याची भविष्यातील कायमस्वरूपी तलावात पाणी राहण्यासाठी नितांत गरज आहे. नैसर्गिक पाण्यामुळेच हा तलाव भरत असल्याने त्यावर विसंबून असलेला शेती व्यवसाय ,मासेमारी व्यवसाय, पर्यटन विकास, पशुधनाची गैरसोय दूर झाली पाहिजे यासाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत तलाव संवर्धन व विकास योजनांचा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी गतवैभव प्राप्त करून देणे व त्याचे नियोजन करणे आतापासूनच महत्त्वाचे आहे. आता तलावाचे पाणी कमी होऊ नये म्हणून आतापासूनच यात पाणी सोडण्यासाठी नियोजनाची गरज असल्याचे जाणकार व शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

 

टॅग्स :RainपाऊसMuktainagarमुक्ताईनगर