19 तासानंतर मुलीचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 13:10 IST2017-06-19T13:10:13+5:302017-06-19T13:10:13+5:30

तापी नदीमध्ये विवाहितेचा शोध सुरूच

After 19 hours the girl's body was found | 19 तासानंतर मुलीचा मृतदेह सापडला

19 तासानंतर मुलीचा मृतदेह सापडला

ऑनलाईन लोकमत 

अमळनेर, दि.19 - जळोद- बुधगाव येथील पुलावरून चहार्डी (ता.चोपडा) येथील विवाहितेने दोन चिमुकल्यांसह रविवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात उडी घेतली होती. बालकाचा मृतदेह रविवारीच सापडला होता. तर चार वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास  सापडला. तर मातेचा शोध सुरूच होता.
चहार्डी येथील अनुराधा सिद्धार्थ वारडे (26) या मातेने आपल्या दोघ चिमुकले सिद्धी (4) व जयेश (पावणे दोन वर्षे) यांच्यासह जळोद-बुधगाव पुलावरून तापीत उडी घेतली होती.
यापैकी जयेशचा मृतदेह रविवारीच हाती लागला होता.रविवारी बराच प्रय} केल्यानंतरही दोघींचे मृतदेह हाती लागले नव्हते. अंधार असल्याने  रविवारी रात्री 8 वाजता शोधकार्य थांबविण्यात आले होते.
सोमवारी सकाळी 5.50 वाजेपासून पुन्हा शोध कार्य हाती घेण्यात आले. यासाठी जळगाव येथून दोन पट्टीचे पोहणारे आले होते. तसेच स्थानिक परिसरातील 7-8 पट्टीच्या पोहणा:यांनी सकाळी शोधकार्य सुरू केले. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सिद्धी वारडे हिचा मृतदेह मिळून आला. तर दुपारी 12 र्पयत विवाहितेला शोधण्याचे काम सुरू होते, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

Web Title: After 19 hours the girl's body was found