शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी वकीलांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:05 IST

कारवाई होण्याची शक्यता ? : घरकुल प्रकरणात झाली शिक्षा

जळगाव : घरकुल प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत मनपा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने सोमवारी काही विधी तज्ज्ञांकडून सल्ला मागविला असल्याची माहिती मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.घरकुल प्रकरणात एकूण ४८ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान पाच नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी, दत्तात्रय कोळी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. पाचपैकी चार नगरसेवक सध्या जामीनावर आहेत. लता भोईटे या अद्याप कारागृहातच आहेत. घरकुल प्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे विद्यमान नगरसेवकांविरूध्द काय कारवाई केली याचा जाब माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकारात विचारला होता. यासंदर्भात अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून हालचालींना गती मिळाली आहे. मनपाने तातडीने पत्राचा आधार घेत विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवला आहे. या प्रकरणात कायदेशिररित्या काय कारवाई करता येईल याबाबत विचारणा केली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून शिक्षेला दोन महिने उलटूनही स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांविरूध्द अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरसेवकांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव